टॉम अँड जेरीची धमाल मस्ती पुन्हा एकदा दिसणार, सिनेमाचा ट्रेलर आऊट

वार्नर ब्रेसने टॉम अँड जेरीचा ट्रेलर यूट्यूब (You Tube) आणि ट्विटर (Twitter) हँडलवर रिलीज केला आहे. आतापर्यंत ४० हजार व्हूज (Views) आणि ५० हजार लाईक्स (Likes) मिळाले आहेत. त्यानंतर आता थोड्याचं वेळात हा ट्रेलर (trailer) लाखोंच्या घरात पोहोचणार आहे. या सिनेमाचा ट्रेलरमध्ये टॉम अँड जरी या व्यतिरिक्त अजून दोन पात्रं बघायला मिळत आहेत. 

टॉम अँड जेरीचं (Tom and Jerry) कार्टून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच प्रेक्षकांना बघायला खूप आवडतं. यामध्ये टॉम म्हणजे मांजर आणि जेरी म्हणजे उंदीर. अश्या या मांजर (Cat) आणि उंदराची (Mouse) जोडी पुन्हा एकदा आपल्याला सिनेमातून पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज (movie trailer out ) झाला असून प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. असे म्हणतात की उंदीर आणि मांजर या दोघांचंही एकमेकांशी कधीच पटत नाही. त्याप्रमाणे या सिनेमात सुद्धा तेच वास्तव आणि दोघांचं प्रेम आपल्याला सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

वार्नर ब्रेसने टॉम अँड जेरीचा ट्रेलर यूट्यूब (You Tube) आणि ट्विटर (Twitter) हँडलवर रिलीज केला आहे. आतापर्यंत ४० हजार व्हूज (Views) आणि ५० हजार लाईक्स (Likes) मिळाले आहेत. त्यानंतर आता थोड्याचं वेळात हा ट्रेलर (trailer) लाखोंच्या घरात पोहोचणार आहे. या सिनेमाचा ट्रेलरमध्ये टॉम अँड जरी या व्यतिरिक्त अजून दोन पात्रं बघायला मिळत आहेत.

परंतु सिनेमात पात्रं कितीही असली तरी टॉम अँड जरी या मांजर आणि पिटुकल्या उंदराच्या खळं-खट्याक करणाऱ्या मस्तीला पाहण्यासाठी सर्व प्रेक्षकांचा प्रतिसाद नक्कीचं मिळेल, असं दिसत आहे. तसेच या सिनेमात काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. असे वार्नर ब्रेसने सांगितले आहे. तसेच हा सिनेमा ५ मार्च २०२१ ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.