marriage

टिकरी(Tikri) गावातील शेतकऱ्याने आपल्या मुलीचं लग्न रविंद्र पटेल या व्यक्तीशी करण्याचं ठरवलं होतं.  चौकशीत मुलगा व्यवस्थित असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र ऐन लग्नाच्या दिवशी नवरा मुलगा आणि त्याचे मित्र दारुच्या नशेत(Drunk groom) लग्न मंडपात आले.

    उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh)प्रयागराजमध्ये एका विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र नवरा मुलगा आणि त्याच्या मित्रांना लग्नमंडपात दारूच्या नशेत पाहिल्यानंतर २२ वर्षांच्या वधूला राग आला. तिने लगेच लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी नवरा आणि वऱ्हाडी मंडळींना बंदीस्त केलं आणि लग्नासाठी दिलेल्या वस्तू परत मागितल्या. कुटुंबियांचं आक्रमक रुप पाहून नवऱ्याकडील मंडळींनी पोलिसांना बोलवलं आणि मध्यस्थी करण्याची मागणी केली.

    प्रयागराजमधील प्रतापगढ शहरातील टिकरी गावात लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. टिकरी गावातील शेतकऱ्याने आपल्या मुलीचं लग्न रविंद्र पटेल या व्यक्तीशी करण्याचं ठरवलं होतं.  चौकशीत मुलगा व्यवस्थित असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र ऐन लग्नाच्या दिवशी नवरा मुलगा आणि त्याचे मित्र दारुच्या नशेत लग्न मंडपात आले. हा प्रकार पाहिल्यानंतर मुलीला संताप झाला. नवरा आणि त्याचे मित्र इतक्यावरच थांबले नाही तर लग्न मंडपात त्यांनी गोंधळही घातला. ठरलेलं लग्न मोडणार कसं असा प्रश्न वधू आणि तिच्या कुटुंबियांना पडला होता. त्यामुळे ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. अखेर संयमाचा बांध फुटला. वरमाला समारोहावेळी नवऱ्याने नवरीला नाचण्याचा आग्रह केला. मुलीने त्याला नकार दिल्याने नवरा मुलगा नाराज झाला. दारुच्या नशेत असल्याने त्याने आणखी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

    नवऱ्या मुलाचं वागणं बघून मुलीने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर आधीच संताप झाल्याने नवरीच्या कुटुंबियांना नवरा मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांना बंदीस्त केलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरण शांत झालं. नवऱ्याच्या कुटुंबियांनी वधुच्या कुटुंबियांना रोख रक्कम आणि अन्य वस्तू पुन्हा परत करण्यास सहमती दर्शवली आहे.