Alcohol will be available only if there is a certificate of corona vaccination in Nilgiris district of Tamil Nadu

तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण पूर्ण व्हावे, याकरिता एक नामी शक्कल लढवली आहे. दारू सरकारी आउटलेटमधून खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आता कोरोना प्रतिबंधक लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच, आता ग्राहकांना दारू खरेदीसाठी आपले दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे लसीकरण प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

    चेन्नई : तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण पूर्ण व्हावे, याकरिता एक नामी शक्कल लढवली आहे. दारू सरकारी आउटलेटमधून खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आता कोरोना प्रतिबंधक लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच, आता ग्राहकांना दारू खरेदीसाठी आपले दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे लसीकरण प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

    ही कारवाई म्हणजे सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या मोहिमेचा एक भाग असल्याचे जिल्हाधिकारी दिव्या यांनी सांगितले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस जिल्ह्यातील जवळजवळ 97% लोकसंख्येला देण्यात आले आहेत.

    आता प्रशासनाला जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लसीचा दुसरा देखील डोस देऊन ही लसीकरण मोहीम पूर्ण करायची आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्हाला ही नवी कल्पना सुचली आहे. दरम्यान, लसीकरण प्रमाणपत्रांव्यतिरिक्त ग्राहकांना आउटलेटमधून दारू खरेदी करण्यासाठी त्यांचे आधारकार्ड सादर करणे देखील अनिवार्य असणार आहे.

    एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

    - संजय राऊत, खासदार, शिवसेना