loudspeaker mosque

मशिदीत लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरमुळे अजानच्या आवाजाने झोपमोड होते. झोप खंडीत झाल्याने नंतर प्रयत्न करूनही झोप येत नाही. त्यामुळे दिवसभर डोकेदुखीला सामोरे जावे लागते आणि दिवसभराचे कामकाज यामुळे प्रभावित होते, असे कुलगुरू प्रोफेसर संगीता श्रीवास्तव यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

  प्रयागराज: पहाटे मशिदीतून(complaint against mosque ajan) दिल्या जाणाऱ्या अजानमुळे झोपमोड होत असल्याची तक्रार अलाहाबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू संगीता श्रीवास्तव(allahabad vice chancellor letter to district collector)  यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात ३ मार्च रोजी कुलगुरूंनी प्रयागराज जिल्हा दंडाधिकाऱ्यांना कारवाई करण्यासंबंधात एक पत्रही लिहिले आहे. यानंतर वादाला नव्याने तोंड फुटले.

  दररोज सकाळी जवळपास ५.३० वाजल्याच्या सुमारास मशिदीत अजानला सुरुवात होते. मशिदीत लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरमुळे अजानच्या आवाजाने झोपमोड होते. झोप खंडीत झाल्याने नंतर प्रयत्न करूनही झोप येत नाही. त्यामुळे दिवसभर डोकेदुखीला सामोरे जावे लागते आणि दिवसभराचे कामकाज यामुळे प्रभावित होते, असे कुलगुरू प्रोफेसर संगीता श्रीवास्तव यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

  यानंतर ईदपूर्वी सहरीची घोषणाही सकाळी ४.०० वाजता होईल. याचादेखील आपल्यासारखाच इतरांनाही त्रास होईल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. कुलगुरूंनी आपल्या या पत्राची एकेक प्रत आयुक्त, आयजी आणि डीआयजींनाही पाठवली आहे. कुलगुरूंच्या तक्रारीनंतर मशीद समितीने २ लाउडस्पीकर हटविले असून इतर दोन लाऊडस्पीकरचा आवाज कमी केला आहे.

  राजकीय टीकेला उधाण
  याप्रकरणी राजकीय टीकेला उधाण आले असून समाजवादी पक्षाचे अनुराग भदौरिया यांनी भाजपाची सरकार बनल्यापासून फक्त जातीधंमावरच चर्चा होत असून रोजगारावर कोणताही जोर देण्यात येत नसल्याचे सांगितले. भाजपाचे प्रवक्ता नवीन श्रीवास्तव यांनी सांगितले की, नमाज करणे अधिकार आहे, परंतु कोर्टाने यापूर्वीही लाऊडस्पीकर लावणे शांततेचा भंग असल्याचे सांगितले आहे. लाऊडस्पीकरचा उपयोग करणे संवैधानिक रूपाने योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

  मौलानांचीही तक्रार
  याप्रकरणी मुस्लिम धर्मगुरू मौलाना सैफ अब्बास यांचे वक्तव्य आले आहे. त्यांनी सांगितले आहे की, फक्त २-३ मिनिटांपुरतेच अजान असते. यासाठी तक्रार करण्याचे कोणतेही कारण नाही. सकाळी आरतीदेखील होते, पण त्याने झोपमोड होते का? अजानसाठी तक्रार करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.