baba ramdev

उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील बैरियाचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी रामदेवांची पाठराखण करीत एक वादग्रस्त विधान केले आहे. आज अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीमध्ये 10 रुपयांची एक गोळी 100 रुपयांना विकली जाते. हे लोक समाजहिताचे काम करणारे नाहीत असेही ते म्हणाले.

    बलिया: उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील बैरियाचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी रामदेवांची पाठराखण करीत एक वादग्रस्त विधान केले आहे. आज अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीमध्ये 10 रुपयांची एक गोळी 100 रुपयांना विकली जाते. हे लोक समाजहिताचे काम करणारे नाहीत असेही ते म्हणाले.

    अ‍ॅलोपॅथीचे काही डॉक्टर राक्षसांपेक्षाही वाईट काम करत आहेत, असा आरोप सुरेंद्रसिंह यांनी केला आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर अ‍ॅलोपॅथी डॉक्टर रुग्णाला आयसीयूमध्ये ठेऊन पैसे वसूल करतात असा आरोपही त्यांनी केला.

    सामाजाने आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि योग अभ्यास या गोष्टी स्वीकारायला हव्या. अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक या दोन्ही उपचार पद्धती समान आहे, असे सांगत सुरेंद्र सिंह यांनी आपण मनापासून रामदेव यांचे अभिनंदन करतो, असे स्पष्ट केले आहे.

    आयएमए अधिकाऱ्यांचे धर्मपरिवर्तन करणाऱ्यांशी संबंध

    रामदेव यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) अधिकाऱ्यांचा संबंध धर्मपरिवर्तन करणाऱ्यांशी असून ते धर्म परिवर्तन करण्यासाठी उकसवतात, असा आरोप केला आहे. एका मुलाखतीदरम्यान रामदेव म्हणाले की, धर्मपरिवर्तन करणाऱ्या लोकांशी आयएमएच्या पदाधिकाऱ्यांचे संबंध आहेत, एवढच नाही तर इंटरनॅशनल फंडिंग घेणाऱ्या लोकांनीच कुंभला कोरोना सुपरस्प्रेडर म्हणत बदनाम केल्याचही रामदेव म्हणाले. हे सगळे धादांत खोटे आहे. कारण कुंभमध्ये लोकच आले नाहीत. 99 टक्के तंबू रिकामे होते आणि आखाड्यांमध्ये फार-फार तर 500 ते एक हजार साधू होते, असा दावाही रामदेव यांनी केला आहे.