अमित शाहांचं पश्चिम बंगालमध्ये शक्तीप्रदर्शन, बोलापूरमध्ये भव्य रोड शो

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २०० जागा जिंकून ममता बॅनर्जींचा सफाया करेल, असं आव्हान पुन्हा एकदा अमित शाहांनी दिलंय. असा रोड शो उभ्या जन्मात पाहिला नव्हता, अशी प्रतिक्रिया अमित शाहांनी दिलीय.

पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवसांत भाजपची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. याचाच भाग म्हणून आज (रविवारी) बिरभूम जिल्ह्यातील बोलपूरमध्ये भव्य रोड शो काढण्यात आला.

तृणमूल काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासह ९ आमदार आणि एक खासदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बिरभूम जिल्ह्यात भाजपच्या वतीनं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी तृणमूल काँग्रेसनंही जागोजागी सरकारच्या कामगिरीचं कौतुक करणारे पोस्टर्स लावून आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. 

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २०० जागा जिंकून ममता बॅनर्जींचा सफाया करेल, असं आव्हान पुन्हा एकदा अमित शाहांनी दिलंय. असा रोड शो उभ्या जन्मात पाहिला नव्हता, अशी प्रतिक्रिया अमित शाहांनी दिलीय.