jagannath yatra

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah In Ahmadabad) यांनी आज अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात (Jagannath Mandir)हजेरी लावत तिथे पूजा केली. 

    आजपासून जगन्नाथ रथयात्रेला(Jagannath Rathyatra) सुरुवात झाली आहे. ओडिशामधल्या पुरी येथे दरवर्षी ही यात्रा भरवली जाते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत मर्यादित स्वरुपात ही रथयात्रा भरवली जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah In Ahmadabad) यांनी आज अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात (Jagannath Mandir)हजेरी लावत तिथे पूजा केली.

    अमित शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, जगन्नाथ रथयात्रेच्या मंगल मुहुर्तावर मी अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात होणाऱ्या आरतीमध्ये अनेक वर्षांपासून सहभागी होत आहे. प्रत्येकवेळी इथे आलं की एक वेगळीच ऊर्जा मिळते. आजही महाप्रभूंची आराधना करण्याचं सौभाग्य लाभलं. महाप्रभू जगन्नाथ सर्वांवर आपली कृपादृष्टी कायम ठेवो ही प्रार्थना!


    न्यायालयाने कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट आणि तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ओडिशा सरकारच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे आणि संपूर्ण राज्यात रथयात्रा काढण्यावर बंदी घातली आहे. गेल्या वर्षीही कोरोना नियमांचं पालन करुनच ही यात्रा भरवण्यात आली होती.

    पुरी जगन्नाथ मंदिराचे प्रशासक अजय जेना यांनी सांगितलं, “गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही ओडिशा सरकारने सर्वोच्च न्यायालय आणि एसओपीच्या आदेशानुसार रथयात्रा भाविकांविना करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह येईल अशा आणि संपूर्ण लसीकरण झालेल्या रथ चालकांना यात्रेत येण्याची परवानगी देण्यात येईल. पोलीस कर्मचारी वगळता सुमारे १००० अधिकारी तैनात केले जातील. ”