An army truck crashed into a 600-foot-deep ravine; 3 soldiers martyred, three seriously injured

हा मार्ग गंगटोकला भारत-चीन सीमेजवळील सोमगो लेक आणि नाथू ला जोडतो. ट्रक कुमाऊं रेजिमेंटचे सहा सैनिक घेऊन गंगटोककडे जात असताना चालकाच्या गाडीवरील ताबा सुटला आणि तो 600 फूट खोल दरीत कोसळला.

    गंगटोक : पूर्व सिक्कीममध्ये लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारा ट्रक घाटात पडल्याने तीन सैनिक ठार झाले तर तीन गंभीर जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, न्यू जवाहरलाल नेहरू रोडवर हा अपघात झाला.

    ते म्हणाले की हा मार्ग गंगटोकला भारत-चीन सीमेजवळील सोमगो लेक आणि नाथू ला जोडतो. ट्रक कुमाऊं रेजिमेंटचे सहा सैनिक घेऊन गंगटोककडे जात असताना चालकाच्या गाडीवरील ताबा सुटला आणि तो 600 फूट खोल दरीत कोसळला.

    यात चालक व इतर दोन जवान जागीच ठार झाले. लष्कराच्या, बीआरओ, पोलिस आणि स्थानिक लोकांनी खराब वातावरणामध्ये बचावाची कामे केली आणि जखमी झालेल्या तीन सैनिकांना गंगटोकच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये हलविले. येथून त्यांना पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.