मंदिरातली मूर्ती लहान मुलासारखी असते, मंदिराच्या संपत्तीबाबत मद्रास हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

कायद्याच्या हिशोबाने मंदिरातील मूर्ती एका लहान मुलाप्रमाणे आहेत. कोर्ट हे या व्यक्ती आणि संपत्ती या दोन्ही बाजूंनी लहान मुलासाठी पालक आहे. त्याचप्रमाणे कोर्ट मंदिरातील मूर्तीचंही रक्षणकर्ता आहे. कोर्टाला मंदिराच्या संपत्तीचीही लहान मुलाप्रमाणे सुरक्षा करायची आहे, असं यावेळी मद्रास हायकोर्टाने सांगितलं आहे.

    तामिळनाडूमधील प्रसिद्ध पलानी मंदिराच्या जमिनीवरुन काही जणांना बाहेर काढण्याचा आदेश देताना न्यायमूर्ती आरएमटी टीका रमन यांनी हे मत नोंदवलं आहे. ही कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून मंदिराची संपत्ती ताब्यात घेऊन बसली होती. दरम्यान, कायद्याच्या हिशोबाने मंदिरातली मूर्ती लहान मुलासारखी असते आणि लहान मुलाच्या हक्काची असल्याप्रमाणे कोर्टानेच त्याच्या मालमत्तेचं संरक्षण करायला हवं असं मद्रास हायकोर्टाने म्हटलं आहे.

    कायद्याच्या हिशोबाने मंदिरातील मूर्ती एका लहान मुलाप्रमाणे आहेत. कोर्ट हे या व्यक्ती आणि संपत्ती या दोन्ही बाजूंनी लहान मुलासाठी पालक आहे. त्याचप्रमाणे कोर्ट मंदिरातील मूर्तीचंही रक्षणकर्ता आहे. कोर्टाला मंदिराच्या संपत्तीचीही लहान मुलाप्रमाणे सुरक्षा करायची आहे, असं यावेळी मद्रास हायकोर्टाने सांगितलं आहे.

    कोर्टाने यावेळी मंदिराला ६० वर्ष आपल्या संपत्तीचा वापर करण्यापासून रोखण्यात आलं होतं याकडे लक्ष वेधलं. तसंच बचाव पक्ष मंदिराच्या संपत्तीवर आपला हक्क सिद्ध करु शकले नसल्याचंही सांगितलं. दरम्यान ज्या संपत्तीवरुन निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टाने हे मत नोंदवलं आहे, ती संपत्ती ब्रिटीशांनी १८६३ मध्ये बक्षीस म्हणून काही लोकांना दिली होती. आपल्या अनेक पिढ्यांचा या जमिनीवर मालकी हक्क राहिल्याचा बचाव पक्षाचा दावा होता. त्यामुळे आपण या संपत्तीचे मालक असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता.