वृद्ध महिलेच्या डोक्यात मारली लोखंडी खुर्ची, तरुणाने गाठला क्रुरतेचा कळस, पाहा video

पीडितेचा मुलगा सुशांत चौधरी याने सांगितले की, त्यांच्या सोसायटीमध्ये हा तरुण वास्तव्यास आहे. हा तरुण सर्व महिलांची आणि मुलींची छेड काढत असतो. परिसरात दादागिरी करत असतो. शनिवारी संध्याकाळच्या वेळी वृद्ध महिला जात होती. आरोपी तरुणाने दुसऱ्या महिलेची छेड काढली त्यामुळे वृद्ध महिलेने त्याला विरोध केला.

गाझियाबाद : एका तरुणाने (young man) वृद्ध महिलेला क्रुरपणे (cruelty) मारहाण केल्याची धक्कादायक घटना गाजियाबादमध्ये घडल्याची सोर आले आहे. वृद्ध महिलेला (old woman ) बेशुद्ध होईपर्यंत हा तरुण मारहाण करत होता. जवळपास उपस्थित असणाऱ्या लोकांनी कोणतीही मदत न करता बघ्यांची भूमिका घेतली. या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. रुणाने महिलेची छेड काढल्याने वृद्ध महिलेने त्याला विरोध केला.

परंतु तरुणाला राग अनावर न झाल्याने त्याने वृद्ध महिलेला मारहाण केली. तरुणाने मारहाण करताना क्रुरतेचा कळस गाठला आहे. वृद्ध महिलेला मिळेल त्या वस्तुने तरुण मारत होता. शेजारी असलेल्या लोखंडी खुर्ची ( iron chair) वृद्ध महिलेच्या डोक्यात  (head) टाकल्याने ती जागीच बेशुद्ध झाली आहे. हा धक्कादायक प्रकार उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे झाला आहे.


पीडितेचा मुलगा सुशांत चौधरी याने सांगितले की, त्यांच्या सोसायटीमध्ये हा तरुण वास्तव्यास आहे. हा तरुण सर्व महिलांची आणि मुलींची छेड काढत असतो. परिसरात दादागिरी करत असतो. शनिवारी संध्याकाळच्या वेळी वृद्ध महिला जात होती. आरोपी तरुणाने दुसऱ्या महिलेची छेड काढली त्यामुळे वृद्ध महिलेने त्याला विरोध केला. ज्याचा तरुणाला राग आला. विरोध केल्याच्या रागामुळे वृद्धला तरुणाने मारहाण केली.

तरुणाने वृद्धेच्या डोक्यात खुर्ची घातल्याने महिला जागीच बेशुद्ध पडली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेच्या आधारे हल्लेखोराचा शोध घेत आहेत.