दिल्ली नंतर आता आंध्रप्रदेशमध्येही दारू महाग

कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प आहे. अर्थव्यवस्थेला थोड्याफार प्रमाणात तरी रुळावर आणता यावे यासाठी दारूची दुकाने सुरु करण्यात आली आहेत. दारुच्या

 कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प आहे. अर्थव्यवस्थेला थोड्याफार प्रमाणात तरी रुळावर आणता यावे यासाठी दारूची दुकाने सुरु करण्यात आली आहेत. दारुच्या माध्यमातून नफा कमवता यावा म्हणून दिल्ली सरकारने दारूचे दर ७५ टक्क्यांनी वाढवले आहेत. दिल्लीत दारूवर कोरोना कर लावण्यात आला. दिल्लीनंतर आता आंध्रप्रदेशमधील सरकारनेही दारूचे दर वाढविले आहेत.आंध्रप्रदेशात दारू आता एमआरपीच्या ७५ टक्के जादा दराने विकली जाणार आहे. ही दरवाढ तात्काळ लागू करण्यात आल्याचे आंध्रप्रदेशचे विशेष मुख्य सचिव रजत भार्गव यांनी सांगितले आहे. लोकांनी दारू पिऊ नये आणि आपल्या आरोग्याचा विचार करावा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. 

आंध्रप्रदेशमध्ये दुपारी १२ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दारुची दुकाने उघडी राहणार आहेत. या दुकानांवर राज्य सरकारचे संपूर्ण नियंत्रण आहे.