श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरनवर शस्त्रक्रिया, चेन्नईत पार पडली अँजिओप्लास्टी

मुथय्या मुरलीधरनची प्रकृती अचानक खालावल्यानंतर रविवारी त्याला चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या तब्येतीची तपासणी केल्यानंतर हृदयात ब्लॉकेजेस असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्याच्यावर तातडीनं अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलीय. 

    श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरनवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलीय. ऐतिहासिक महान फिरकीपटू आणि हैद्राबद सनरायजर्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरनवर चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी करण्यात आली.

    मुथय्या मुरलीधरनची प्रकृती अचानक खालावल्यानंतर रविवारी त्याला चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या तब्येतीची तपासणी केल्यानंतर हृदयात ब्लॉकेजेस असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्याच्यावर तातडीनं अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलीय.

    मुरलीधरनला आता डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं सांगण्यात आलंय. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ते पुन्हा हैद्राबाद सनरायजर्स संघाच्या प्रशिक्षणपदी पुन्हा रुजू होतील आणि आपल्या कामाला सुरुवात करतील, अशी माहिती मिळतेय.

    कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ८०० विकेट्स घेण्याचा विक्रम मुरलीधरन यांच्या नावावर आहे. १३३ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ही कामगिरी केलीय. तर ३५० एकदिवसीय सामन्यांमध्ये मुरलीधरनं ५३४ बळी टिपलेले आहेत. मुरलीधरन यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना त्यांचे चाहते करत आहेत.