Angry employees sabotage the iPhone company and cause a loss of Rs 437 crore

कर्मचाऱ्यांनी केलेल्या तोडफोडीमुळे कंपनीचे तब्बल ४३७ कोटी रुपयांचे नुकसान (loss of Rs 437 crore) झाले आहे. पगार थकवल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला अचानक हिंसक वळण प्राप्त झाल्याने अनर्थ घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कर्मचाऱ्यांनी कंपनीतील कार्यालयाची तोडफोड केली.

बंगळुरु : बंगळूरुमधील आयफोन निर्मात्या कंपनीने कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे वेतन थकवल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी (Angry employees) थेंट कंपनीत तोडफोड (sabotage the iPhone company) करत मोठे नुकसान केले आहे. बंगळूरुत आयफोन निर्माती तायवान कंपनीचा कारखाना आहे. ही कंपनी आयफोन मोबाईल तयार करते. कंपनीने गेल्या अनेक महिन्यांपासून पगार थकवल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रागाचा कडेलोट झाल्याने ही घटना घडली आहे.

कर्मचाऱ्यांनी केलेल्या तोडफोडीमुळे कंपनीचे तब्बल ४३७ कोटी रुपयांचे नुकसान (loss of Rs 437 crore) झाले आहे. पगार थकवल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला अचानक हिंसक वळण प्राप्त झाल्याने अनर्थ घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कर्मचाऱ्यांनी कंपनीतील कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयांच्या काचा फोडल्या, संगणकांची तोडफोड केली. तसेच कंपनी बाहेर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कंपनीवर दगडफेक करत काचांचा चुराडा केला. तर वाहनतळात उभ्या असलेल्या गाड्यांचीही तोडफोड केली आहे. काहींनी तर कपनीच्या बोर्डाला आगच लावली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कंपनीकडे धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी एकूण १२५ जणांना अटक केली आहे. कर्मचाऱ्यांनी रागामध्ये पोलिसांवरही दगडफेक केला असल्याचे सांगितले जात आहे. परंतु पोलिसांनी लाठी-काठीचा वापर करुन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच या घटनेचा तपास सुरु केला आहे.