zydus cadila

या लशीच्या आपात्कालीन वापराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या तज्ज्ञ समितीने या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. समितीने या लशीच्या दोन डोसांच्या प्रभावाबाबत अतिरिक्त डेटाही मागितला आहे. कॅडिला हेल्थकेयर लिमिटेड कंपनीने या लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी मिळावी यासाठी एक जुलैला अर्ज केला होता.

    दिल्ली : आता देशात आणखी एका कोरोना लशीला मंजुरी मिळाली आहे, ही लस म्हणजे झायकोविड. जी भारताने तयार केलेली जगातील पहिली डीएनए प्लासमीड कोरोना लस आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील झायडस कॅडिला कंपनीने तयार केलेली ही तीन डोसवाली लस. केंद्र सरकारचे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजी आणि इंडियन काऊन्सिलल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या मदतीने ही लस विकसित करण्यात आली आहे.

    या लशीच्या आपात्कालीन वापराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या तज्ज्ञ समितीने या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. समितीने या लशीच्या दोन डोसांच्या प्रभावाबाबत अतिरिक्त डेटाही मागितला आहे. कॅडिला हेल्थकेयर लिमिटेड कंपनीने या लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी मिळावी यासाठी एक जुलैला अर्ज केला होता.

    यावेळी 28 हजार जणांवर करण्यात आलेल्या शेवटच्या ट्रायलच्या डेटानुसार हे आवेदन करण्यात आले होते. या लशीचा प्रभाव 66.6 टक्के असल्याचे या ट्रायलमध्ये दिसून आले. शिवाय ही लस 12 ते 18 वयोगटातील लहान मुलांसाठीही सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.