प्रतिकात्मक फ़ोटो
प्रतिकात्मक फ़ोटो

लॉकडाऊनमुळे रखडलेले बॉलीवूड मधील प्रोजेक्ट पुन्हा एकदा सुरू झाले आहे. अनलॉक नंतर सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बराच व्यस्थ आहे. दरम्यान काळवीट शिकारप्रकरणी आज 1 डिसेंबर सलमानची राजस्थामधील कोर्टात सुनावणी होती. पण तो कोर्टात हजर राहू शकणार नाही, अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली. यासोबतच वकिलांनी कोर्टामध्ये अटेंडन्स अपोलॉजी सादर केली. न्यायाधिशांनी त्याचा स्वीकार केला असून पुढील सुनावणी १६ जानेवारी रोजी होणार आहे.

जोधपूर (Jodhpur).  लॉकडाऊनमुळे रखडलेले बॉलीवूड मधील प्रोजेक्ट पुन्हा एकदा सुरू झाले आहे. अनलॉक नंतर सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बराच व्यस्त आहे. दरम्यान काळवीट शिकारप्रकरणी आज 1 डिसेंबर सलमानची राजस्थामधील कोर्टात सुनावणी होती. पण तो कोर्टात हजर राहू शकणार नाही, अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली. यासोबतच वकिलांनी कोर्टामध्ये अटेंडन्स अपोलॉजी सादर केली. न्यायाधिशांनी त्याचा स्वीकार केला असून पुढील सुनावणी १६ जानेवारी रोजी होणार आहे.

वाढत्या कोरोना संक्रमणाचा दिला दाखला
काळवीट शिकारप्रकरणी राजस्थानच्या सेशन कोर्टामध्ये सलमानची सुनावणी होती. सलमानने स्वत: तिथे उपस्थित राहणे आवश्यक होते. पण मुंबई आणि राजस्थानमध्ये कोरोना भरपूर वाढला आहे. त्यामुळे हा धोका मी पत्करु शकत नाही. असे कारण देत सलमानने तिथे जाण्याचे टाळले. विशेष म्हणजे, सलमान खानला 5 एप्रिल 2018 रोजी या प्रकरणात दुय्यम कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सलमानने शिक्षेविरोधात जिल्हा आणि सत्र जिल्हा न्यायालयात अपील केले आहे. त्याचबरोबर आर्म्स अ‍ॅक्ट प्रकरणात सलमानला निर्दोष सोडण्याच्या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारने एक आव्हान दिले आहे. आज या दोन्ही खटल्यांची सुनावणी होणार होती. आता ही सुनावणी १६ जानेवारी रोजी होणार आहे.