जम्मू – काश्मीरमधील पुचल भागात लष्कराकडून ५ दहशतवाद्यांचा खात्मा

पुचलमध्ये दहशतवादी लपून बसले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्यानं तात्काळ सर्च ऑपरेशन सुरु केलं.

    श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील पुचल भागात दहशतवादी व भारतीय सैन्यात सुरु असलेल्या चकमकीत भारतीय सैन्याच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे समोर आले आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या चकमक अद्यापही सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.


    काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप सर्च ऑपरेशन सुरु आहे. पुचलमध्ये दहशतवादी लपून बसले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्यानं तात्काळ सर्च ऑपरेशन सुरु केलं. काश्मीर पोलीस आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये गेल्या २४ तासात ५ दहशतवादी ठार झाले आहे.