Arrested Harshvardhan Jadhav's son blows political dust; Father's panel raised against mother

मारहाण प्रकरणी भाजपचे नेते रावसाहेब दानवे तथा कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) पुण्यात अटकेत आहे. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा आदित्य याने कन्नडच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणत राजकीय धुरळा उडवला आहे. आदित्यने थेट आईविरोधात वडिलांचं पॅनल उभं केलं आहे.

औरंगाबाद : मारहाण प्रकरणी भाजपचे नेते रावसाहेब दानवे तथा कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) पुण्यात अटकेत आहे. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा आदित्य याने कन्नडच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणत राजकीय धुरळा उडवला आहे. आदित्यने थेट आईविरोधात वडिलांचं पॅनल उभं केलं आहे.

आदित्य सध्या अकरावीत शिकत आहे. आदित्य जाधव यांनं थेट पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली आहे. हर्षवर्धन यांचे पॅनल हे त्यांची पत्नी व भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या विरोधात उभं केल आहे. आदित्यच्या या घोषणेमुळे कन्नडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

हर्षवर्धन जाधव यांना अटक झाल्यानंतर आदित्यने स्वतः सर्व सूत्रे हातात घेतली आहेत. त्याने राजकीय वाटचाल सुरू केल्याने राजकारणातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून सर्व कार्यकर्ते सोबत असल्याचा विश्वास आदित्यने या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

आदित्य जाधवने ऐन ग्रामपंचायतीच्या निवडणूक रणधुमाळीत राजकारणात उडी घेतली आहे. तसेच हर्षवर्धन जाधव पून्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याची घोषणाही त्याने केली आहे.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव आणि इषा झा या दोघांविरोधात पुण्यात खूनाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. १५ डिसेंबर रोजी त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव यांचे सासरे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीच हा हल्ला घडवून आणला आणि जाधव खोट्या गुन्ह्यात अडकवलं, असा सणसणाटी आरोप त्यांच्या वकीलांनी केला आहे.