AAP in Gujrat

आम आदमी पार्टी (आप)(AAP) २०२२ मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal in Gujrat) यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

    आम आदमी पार्टीने(Aam Aadmi Party) आता गुजरातमधील विधानसभा निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे. आम आदमी पार्टी (आप)(AAP) २०२२ मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal in Gujrat) यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

    विधानसभा निवडवणुकी अगोदर गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचा प्रसार करण्यासाठी केजरीवाल आज अहमदाबादेत पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत काही जणांनी आपमध्ये प्रवेश केला. गुजरातचे माजी पत्रकार इसुदान गढवी यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला.


    अरविंद केजरीवाल म्हणाले की, “आम आदमी पार्टीचे उमेदवार सर्व जागा लढवतील. गुजरातमधील नागरिक विचार करत आहेत की, जर दिल्लीमध्ये वीज मोफत दिली जात आहे, तर मग इथं का नाही? इथल्या रूग्णालयांची परिस्थिती देखील मागील ७० वर्षांपासून सुधारलेली नाही. मात्र आता परिस्थिती बदलेल.”

    “आज गुजरातची जी अवस्था आहे ते भाजपा व काँग्रेस सरकारचे कारस्थान आहे. मागील २७ वर्षांमध्ये एकाच पक्षाचे सरकार आहे. असं म्हणतात की काँग्रेस भाजपाच्या खिशात आहे. गुजरातमधील व्यापारी घाबरलेले आहेत. शिक्षण खराब आहे आणि चांगल्या दर्जाचे रूग्णालयं नाहीत, करोनात गुजरात अनाथ झालं होतं. आज गुजरातला एक सक्षम पर्याय मिळाला आहे. गुजरातमध्ये वीज एवढी महाग का आहे? गुजरातमधील रुग्णालयं व शाळा चांगल्या का नाहीत? मात्र हे आता होईल.” असा विश्वासही यावेळी केजरीवाल यांनी व्यक्त केला.

    अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या एका नव्या मॉडेलचं आश्वासन दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, दिल्ली मॉडेल वेगळं आहे आणि गुजरातचं एक वेगळं मॉडेल असेल. २०२२ च्या निवडणुकीत येथील जनतेच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाईल आणि चेहरा देखील इथलाच असेल.