As soon as Anwar started chanting, he killed his colleague by putting a tabla on his head

दिल्ली : सहकाऱ्याची गमंत करण्याच्या नादात एका व्यक्तीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. गंमत करण्यावरुन झालेल्या वादातून एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यात तबला घातला आणि त्यातच त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

दिल्ली येथील आर. के. पूरम येथील गुरुद्वारामध्ये हा प्रकार घडला. रविंद्र सिंग असं मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही या गुरुद्वारामध्ये देखभालीचे काम करत होते. गुरुद्वारामधील कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या खोल्यांमध्ये हे दोघेही राहत होते. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.

तबल्याचा वापर करुन डोक्यावर अनेकदा टपली मारल्याप्रमाणे हलका धक्का देत आरोपी दर्शन हा रविंद्रला त्रास देत होता. मात्र, दर्शन वारंवार असं करत असल्याने रविंद्र संतापला आणि त्यातून त्या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून दर्शनने रविंद्रच्या डोक्यात तबला घातला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने रविंद्रचा मृत्यू झाला.