As soon as the result was announced Violence in Bengal; BJP office set on fire

पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच पश्चिम बंगालमधल्या आरामबाग इथं असलेल्या भाजपाच्या कार्यालयाला आग लागल्याचं समोर आले.  आहे. या प्रकरणात तृणमूल काँग्रेसवर आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. येथील आगीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याचबरोबर भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

    कोलकाता : पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच पश्चिम बंगालमधल्या आरामबाग इथं असलेल्या भाजपाच्या कार्यालयाला आग लागल्याचं समोर आले.  आहे. या प्रकरणात तृणमूल काँग्रेसवर आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. येथील आगीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याचबरोबर भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

    आपल्या ट्विटमध्ये त्यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ही आग लावली असल्याचे आरोप केले आहेत. त्याचसोबत या कृत्याचा निषेधही केला आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसकडून ह्या आगीसंदर्भातले आरोप फेटाळले जात आहेत.

    कूचबिहारमध्येही भाजपा उमेदवाराच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. यासोबतच भाजपाच्या एका कार्यकर्त्याने बॉम्ब फेकल्याचा आरोपही तृणमूल काँग्रेसने केला आहे. यापूर्वी दुपारी निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट होताच तृणमूल कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयाबाहेर गोंधळही घातला होता.