वडिल घोरत असल्याने मुलाला आला राग, झोपेतच केले असं काही…

वडील आणि मुलामधला वाद एवढा विकोपाला गेला की मुलाने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झाल्याने बापाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुलाने पळ काढला आहे.

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील पीलभीत येथे एका क्षुल्लक कारणावरुन मुलाने जन्मदात्या पित्याची हत्या केली आहे. वडिल आणि मुलगा रात्रीच्या वेळी झोपले होते. वडिल घोरत असल्याचा मुलाला त्रास होत असे. यामुळे त्यांच्यात नेहीमी खटका उडत होता. परंतु  मंगळवारी रात्री वडिल आणि मुलगा घरी दोघेच होते. घोरण्याच्या आवाजाचा त्रास झाल्याने मुलाने वडिलांना काठीने बेदम मारहाण केली आणि त्यांच्यात वाद झाला. 

वडिल आणि मुलामधला वाद एवढा विकोपाला गेला की मुलाने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झाल्याने बापाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुलाने पळ काढला आहे. 

उत्तर प्रदेशातील पीलभीत जिल्ह्यातील सौधा गावातील ही घटना आहे. पत्नी आणि लहान मुलगा कार्यक्रमाला गेले होते. मोठा मुलगा आणि वडील दोघेच घरी झोपले होते. त्यांच्यात नेहमी घोरण्याच्या कारणावरुन वाद होत असायचे हा वाद विकोपाला गेल्याने बापाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर मुलगा फरार झाला. स्थानिकांना माहिती मिळताच त्यांनी पोलीसांना बोलाविले आणि वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलीसांनी मुलावर गुन्हा दाखल केला असून सर्वत्र शोध सुरु आहे.