Storm firing on Assam-Mizoram border; Six policemen were killed and Marathmole police officer Vaibhav Nimbalkar was injured

सीआरपीएफ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सध्या येथे स्थिती शांत असलीत्तरी कोणत्याही क्षणी उद्रेक होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळेच आम्ही कोणत्याही व्यक्तीला सीमा प्रवेश करण्याची परवानगी देत नसल्याचे त्यांनी सांगितले. मिझोरामतर्फे येत असलेल्या ट्रकला परवानगी दिली जात आहे परंतु आसाम सीमेवरून मिझोराममध्ये मात्र जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

    गुवाहाटी : आसाम आणि मिझोराममध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर तणाव वाढला आहे. केंद्र सरकारच्या मध्यस्थीनंतरही दोन्ही राज्यांतील मतभेद अद्यापही निवळलेले नाहीत. एवढेच नव्हे तर आसाम सरकारने महामार्गावर नाकेबंदी केल्यामुळे मिझोराममध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही बाधित झाला आहे. मिझोरामनजीक आसाममधील लैलापूर गावातील महामार्गावर पोलिस चौकीजवळ बॅरिकेटिंग करण्यात आले असून यामुळे संपूर्ण दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे. या मार्गावर ट्रकची लांबच लांब रांग लागली असून जीवनावश्यक वस्तूंनी लादलेले ट्रक सीमेवरच उभे आहेत. चारही बाजूंनी अन्य राज्य असल्यामुळे मिझोरामची कोंडी झाली आहे.

    नाकेबंदीस नकार, तरीही स्थगिती

    दरम्यान मिझोराम सरकारने केंद्राकडे सीमेवरील नाकेबंदी हटविण्याची मागणी केली आहे, मंगळवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी स्वत: मिझोरामची कोणतीही आर्थिक नाकेबंदी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते या नंतरही स्थिती उद्भवली आहे. सीमेवरील चौकीवर तैनात सीआरपीएफची तुकडी कोणताही ट्रक, बस अथवा कार रोखत असून लोकांनाही सीमापार करण्यास मज्जाव केला जात आहे.

    तूर्तास शांतता, पण…

    दरम्यान, सीआरपीएफ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सध्या येथे स्थिती शांत असली त्तरी कोणत्याही क्षणी उद्रेक होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळेच आम्ही कोणत्याही व्यक्तीला सीमा प्रवेश करण्याची परवानगी देत नसल्याचे त्यांनी सांगितले. मिझोरामतर्फे येत असलेल्या ट्रकला परवानगी दिली जात आहे परंतु आसाम सीमेवरून मिझोराममध्ये मात्र जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.