लखनऊमध्ये ATS ची मोठी कारवाई, अलकायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक, प्रेशर-कुकर बॉम्ब जप्त

उत्तर प्रदेशमधील काकोरी भागात काही दहशतवादी लपले असून ते काहीतरी भयंकर योजना आखत असल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली. मग एटीएसनं मोठ्या फौजफाट्यासह काकोरीमध्ये छापा मारून दोन संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलं. त्यातील एकाचं नाव शाहिद असल्याची माहिती असून दुसऱ्याचा तपास सुरू आहे.

    लखनऊ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखनऊमध्ये दहशतवाद विरोधी पथकानं (UP ATS) दोन संशयित दहशतवाद्यांना (Suspect terrorist) अटक केली आहे. या दोघांचे अल्-कायदा (Al-Qaeda) या दहशतवादी संघटनेशी (Terrorist organization) संबंध असल्याचा संशय पोलिसांना असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रेशर-कुकर बॉम्ब (Pressure cooker bomb) जप्त करण्यात आला असून इतरही अनेक शस्त्रास्त्रं (Weapons) पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

    उत्तर प्रदेशमधील काकोरी भागात काही दहशतवादी लपले असून ते काहीतरी भयंकर योजना आखत असल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली. मग एटीएसनं मोठ्या फौजफाट्यासह काकोरीमध्ये छापा मारून दोन संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलं. त्यातील एकाचं नाव शाहिद असल्याची माहिती असून दुसऱ्याचा तपास सुरू आहे.

    शाहिद काकोरीमध्ये स्वतःच्या मालकीच्या घरात सहकुटुंब राहत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. गॅरेजचा व्यवसाय करणाऱ्या शाहीदच्या घरातून प्रेशर कुकर बॉम्ब पोलिसांना मिळाला.