ममता बॅनर्जींवर हल्ला; पायाला झाली दुखापत, राजकीय वातावरण तापले!

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे एकेकाळची विश्वासू सहकारी असलेले शुभेंदू अधिकारी आता त्यांच्याच विरोधात भाजपकडून नंदीग्राममध्ये मैदानात उतरले आहेत. नंदिग्राममधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या ममतांवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  कोलकाता (Kolkata).  पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे एकेकाळची विश्वासू सहकारी असलेले शुभेंदू अधिकारी आता त्यांच्याच विरोधात भाजपकडून नंदीग्राममध्ये मैदानात उतरले आहेत. नंदिग्राममधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या ममतांवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  बॅनर्जी या आज बुधवारी नंदिग्राममध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. नेमके काय घडले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सुरक्षारक्षकांनी ममतांना उचलून मोटारीत बसवल्याचे दिसले. या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. आज रात्री नंदिग्राममध्ये मुक्काम करण्याचे ममतांचे नियोजन होते. मात्र, या हल्ल्यानंतर त्या थेट कोलकत्याकडे रवाना झाल्या. दम्यान, कारजवळ उभी असता काही लोकांनी धक्का दिला असे ममता म्हणाल्या.

  आयोगाकडे तक्रार करणार
  या घटनेनंतर तृणमूल काँग्रेसने या घटनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे मात्र स्पष्ट झाले नाही,

  हे काय तालिबान आहे?
  दुसरीकडे, ममता बॅनर्जींवरील हल्ल्याच्या वृत्तानंतर बंगाल भाजपा उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांनी हा काय तालिबान आहे का असा सवाल केला. मोठ्या संख्येत त्यांच्या अवतीभवती पोलिस असतात. त्यांच्यापर्यंत कोण पोहोचू शकतो असा सवाल केला. चार आयपीएस अधिकारी त्यांच्या सुरक्षेचे प्रभारी आहेत. त्यांचे निलंबनच व्हायला हवे. हल्लेखोर अचानक गायब होऊच शकत नाही, बॅनर्जीच नाटक करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.