नांदेडमधील ‘हल्ला मोहल्ला’ कार्यक्रमात मिरवणूक काढू न दिल्याने पोलिसांवर हल्ला, ८ जण जखमी

शीख समाजाकडून हल्ला मोहल्ला कार्यक्रमात मिरवणूक काढत कोरोना नियमांची पायामल्ली करण्यात आली. या हल्लाबोल निवडणूकीची परवानगी नाकारल्यामुळे संतप्त तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत ८ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे.

    राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सर्वच धार्मिक कार्यक्रमांनी बंदी घालण्यात आली आहे. राज्यात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु शीख समाजाकडून हल्ला मोहल्ला कार्यक्रमात मिरवणूक काढत कोरोना नियमांची पायामल्ली करण्यात आली. या हल्लाबोल निवडणूकीची परवानगी नाकारल्यामुळे संतप्त तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत ८ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे.

    संतप्त तरुणांनी केलेल्या दगडफेकेत पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. डीवायएसपीवरही जीवघेणा हल्ला झाला आहे. नांदेडमधील वजिराबाद पोलीस ठाण्यात या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. तरुणांनी केलेल्या दगडफेकीनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासन आणि पोलीसांनी सचखंड गुरुद्वारा बोर्डाकडून काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल मिरवणूकीला विरोध केला होता. कोरोना परिस्थिती वाढत असल्यामुळे मिरवणूक काढू नये अशे आदेश देण्यात आले होते. तसेच वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शीख समाजाने जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केली होती. हल्लाबोल मिरवणूकीला परवानगी नसतानाही शीख समाजाकडून हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली होती. यादरम्यान शीख तरुणांनी रस्त्यावर असलेले बॅरिगेड्सची तोडफोड केली होती. तसेच तलवारी काढून शहरात एकच दहशत निर्माण केली होती. यामुळे सदर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.