लग्नात ‘या’ वस्तूसाठी केला होता अट्टाहास, ऐन मुहूर्तावर नवरदेवाने केला विश्वासघात

लग्नात हुंडा म्हणून मोठी गाडी न दिल्यामुळे नवरदेवाने लग्नाला नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

करनाल : लग्नात हुंडा देणं आणि घेणं हे काही लोकांमध्ये सध्या सुरूच आहे. परंतु या प्रकारामुळे लग्न मोडणे किंवा मुलींचा विश्वासघात करणे असा तडाखा सध्या सुरू आहे. लग्नात हुंडा म्हणून मोठी गाडी न दिल्यामुळे नवरदेवाने लग्नाला नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हरियाणातील (Hariyana) मेरठ रोडमध्ये असलेल्या हनुमान कॉलनीत (Hanuman Colony) राहणार्‍या मुस्लीम कुटुंबातील ही घटना आहे. या घरात २० डिसेंबरला मिरवणूक काढण्यात येणार होती. वधूच्या वडिलांनी सांगितले की, तिच्या मुलीचे लग्न जुळवण्याचे वर्षभरापासून सुरू होते. मुलाकडील मंडळींनी ११०० रुपये देऊन विवाह पक्का केला. नवरदेवाचे फर्निचरचे शोरूम आहे. तरीदेखील मुलीकडच्यांनी फर्निचर द्यावे असा अट्टाहास केला. मुलाने लग्नाचं वचन दिलं आणि लग्नाची तयारी सुरू झाली.

लग्नाची तयारी सगळी पूर्ण झाली आणि ऐन मुहूर्तावर वर पक्षानं लग्नासाठी नकार दिला. मुलीकडच्या नातेवाईकांनी मोठी गाडी न दिल्यानं नवरदेव आणि वरमंडळी रूसली आणि लग्न मोडलं. नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी लग्नाला आलीच नाहीत. लग्नमंडपात एकटी वधू त्यांची वाट पाहात ताटकळत बसली होती.

अल्टो कारसह १० लाखापर्यंत वस्तू देण्यास मान्य

या मुलीने अल्टो कारसह १० लाखापर्यंत वस्तू देण्यास मान्य केले, परंतु अद्याप वर पक्षाचे लोक या प्रस्तावाला सहमत नाहीत. त्यांनी गाडी छोटी देत असल्याच्या प्रस्तावावर बोट दाखवत लग्न करण्यास नकार दिला.