Avalanches in Uttarakhand; Five young men are missing

नौदलाचे 20 जणांचे पथक त्रिशुळ पर्वतावर चढाई करत असताना सकाळी साधारण साडेपाच वाजता पथकातले 5 जण आणि त्यांच्यासोबत चालणारा एक पोर्टर अचानक हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडले. या घटनेनंतर सर्व सहा जण बेपत्ता असून भारतीय नौदल आणि प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली असून अद्याप कुणाचाही शोध लागला नाही.

    चमोली : उत्तराखंडमधील चमोली येथे भारतीय नौदलातील जवानांसोबत दुर्दैवी घटना घडली आहे. चमोली येथे हिमस्खलन होऊन त्रिशुळ पर्वतावर चढाई करत असलेल्या भारतीय नौदलाचे 5 जवान, 1 पोर्टर बेपत्ता आहे(Avalanche in Uttarakhand). भारतीय नौदलाच्या गिर्यारोहक दलाला या घटनेमुळे फटका बसला आहे.

    नौदलाचे 20 जणांचे पथक त्रिशुळ पर्वतावर चढाई करत असताना सकाळी साधारण साडेपाच वाजता पथकातले 5 जण आणि त्यांच्यासोबत चालणारा एक पोर्टर अचानक हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडले. या घटनेनंतर सर्व सहा जण बेपत्ता असून भारतीय नौदल आणि प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली असून अद्याप कुणाचाही शोध लागला नाही.

    नेहरू गिर्यारोहक संस्थेच्या बचाव पथकालाही त्रिशूळ पर्वतावर शोधमोहीमेसाठी पाठविले आहे. नौदलाचे हे पथक 15 दिवसांपूर्वी 7, 120 मीटर ऊंची असलेल्या त्रिशुळ पर्वतावर चढाईसाठी रवाना झाले होते. शुक्रवारी पथक जेव्हा पुढे गेले तेव्हा त्यांना बर्फाच्या वादळाचा सामना करावा लागला, पथकातील 5 जवान आणि 1 पोर्टर यामध्ये बेपत्ता झाले आहेत. तसेच नौदल आणि प्रशासनातर्फे शोधमोहीम चालू आहे.