प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

सध्या बिहार बोर्डाची मॅट्रिकची परीक्षा सुरू आहे. पहिले सोशल सायन्सचा पेपर फुटला आणि आता इंग्रजीचा बनावट पेपर व्हायरल झाल्यामुळे प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. परंतु, या सर्व धक्कादायक घटना बाजूला ठेवत परीक्षा केंद्रातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुजफ्फरपूरच्या या परीक्षा केंद्रात परीक्षा देण्यासाठी आलेल्या शांती देवी या महिलेने परीक्षा केंद्रातच एका मुलाला जन्म दिला आहे.

  दिल्ली (Delhi ).  सध्या बिहार बोर्डाची मॅट्रिकची परीक्षा सुरू आहे. पहिले सोशल सायन्सचा पेपर फुटला आणि आता इंग्रजीचा बनावट पेपर व्हायरल झाल्यामुळे प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. परंतु, या सर्व धक्कादायक घटना बाजूला ठेवत परीक्षा केंद्रातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुजफ्फरपूरच्या या परीक्षा केंद्रात परीक्षा देण्यासाठी आलेल्या शांती देवी या महिलेने परीक्षा केंद्रातच एका मुलाला जन्म दिला आहे. सध्या देशात अजब नाव देण्याचे फॅडच लागले आहे. त्यामुळे या दाम्पत्यानेही परीक्षेदरम्यान जन्म झाल्याने आपल्या मुलाचे नाव ‘इम्तिहान’ असे ठेवले आहे. यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  तासाभर दिली होती परीक्षा (The exam was given for an hour)
  बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील एमडीडीएम महाविद्यालय परीक्षा केंद्राचे अधीक्षक डॉ. मीरा मधुमिता यांनी की, या महाविद्यालयात मॅट्रिक परीक्षा केंद्र बनविण्यात आले आहे. शुक्रवारी दुसऱ्या शिफ्टदरम्यान शांती देवी नावाच्या एका महिलेला तासभर परीक्षा दिल्यानंतर अचानक प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या. अ‍ॅनिगिलेटरने तातडीने याची माहिती दिली. यानंतर शांती यांना स्वतंत्र कक्षात बोलावून जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना कळविण्यात आले.

  त्यांच्या सूचनेनंतर शांती यांना रुग्णवाहिकेतून सदर रुग्णालयात पाठवले गेले, तेथे तिने सायंकाळी उशीरा मुलाला जन्म दिला. शांतीचे पती बिरजू साहनी म्हणतात की, प्रसूती वेदना होण्यापूर्वी तिने ओबजेक्टिव्ह प्रश्न सोडविले होते. परीक्षेच्या वेळी देवाने त्यांना मुलगा दिला, म्हणूनच त्याला ‘इम्तिहान’ असे नाव देण्यात आले. शांतीला पुढील शिक्षण घेऊन नोकरी करायची आहे.

  स्वच्छता, लॉकडाऊन, कोविड-कोरोना तर कुठे नरेंद्र मोदी
  याआधीही, अशी नावे देण्याची अनेक उदाहरणे गेल्या वर्षभरात समाज माध्यमांमध्ये झळकली. लातूरमधील मोहन आणि काजल कुरीन या दाम्पत्याने मुलीचे नाव स्वच्छता असे ठेवले होते. नागरीकांनी आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा या उद्देशाने त्यांनी मुलीचे स्वच्छता असे नाव ठेवल्याचे दाम्पत्याने सांगितले.

  राजस्थानच्या अलवारमधून त्रिपुरातील बधरघाट येथे स्थलांतरीत झालेल्या जोडप्याला पुत्ररत्न झाले होते. लॉकडाउनमुळे त्रिपुरात अडकल्याने त्यांनी आपल्या नवजात बाळाचे नाव ‘लॉकडाउन’ असे ठेवले होते. संजय बौरी आणि मंजू बौरी अशी या स्थलांतरीत मजूरांची नावे आहेत.

  कोरोनाकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन लावला होता. तेव्हा छत्तीसगडमधील रायपूर येथे एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. या महिलेने जुळ्या मुलांची नावे कोरोना आणि कोविड अशी ठेवली होती. वाराणसी येथील नारायण केसरी आणि सुमन केसरी यांच्या घरी 17 सप्टेंबर रोजी मुलाचा जन्म झाला. 17 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आहे. हे औचित्य साधून केसरी दापत्यानी आपल्या मुलाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवले होते.