अयोध्या हे भारताचं ‘ह्रदय’ असे म्हणत; प्रभू श्रीराम यांच्या आरतीत तल्लीन झाला ‘हा’ गायक

अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमील भेट देण्याची माझी गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती, जी आज पूर्णत्वाला गेली. सनातन धर्मात आस्थेची सर्वात मोठी जागा म्हणजे अयोध्या होय. येथे बनविण्यात येणारे प्रभू श्रीराम यांचे मंदिर भारत देशाची शान असेल

अयोध्या: प्रसिद्ध गायक सोनू निगमसह काँग्रेस नेते संजय निरुपम दिग्दर्शक संदीपसिंह यांनी अयोध्येत जाऊन राम लल्ला आणि बजरंगबलीचं दर्शन घेऊन पूजाही केली. अयोध्येतील राम जन्मभूमी येथील प्रभू श्रीराम यांच्या आरतीतही तल्लीन होऊन पुजेचा भक्तीमय आनंद घेतला. यावेळी बोलाताना, अयोध्या हे भारताचं ह्रदय असल्याचं सोनू निगमने म्हटले. तसेच, मुझे अपनी शरण मे ले लो ही धूनही सोनू यांनी वाजून दाखवली.

अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमील भेट देण्याची माझी गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती, जी आज पूर्णत्वाला गेली. सनातन धर्मात आस्थेची सर्वात मोठी जागा म्हणजे अयोध्या होय. येथे बनविण्यात येणारे प्रभू श्रीराम यांचे मंदिर भारत देशाची शान असेल, असे म्हणत सोनूने राम मंदिराच्या निर्माणसाठी वीट रचण्याची इच्छाही व्यक्त केली.
.