दोन महिन्यांत ५० कोटी लोकांना लस देणं शक्य, अझीम प्रेमजींनी मोदी सरकारला दिली ही आयडिया

केंद्र सरकारने जर खासगी कंपन्यांना लसीकरणाच्या मोहिमेची जबाबदारी दिली, तर अधिक वेगानं कोरोना लसीकरण होऊ शकेल, असं मत प्रसिद्ध उद्योगपती असीम प्रेमजी यांनी व्यक्त केलंय. मोदी सरकारने कोरोना लसीच्या वितरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केलीय. सरकारची कार्यपद्धती वेगवान आणि प्रभावशाली असून जर यात खासगी कंपन्यांची मदत घेतली, तर अधिक परिणामकारकरित्या हे काम करता येऊ शकेल, असं प्रेमजी यांनी म्हटलंय. बेंगलोर चेंबर ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्सच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

    संपूर्ण जग गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटाचा सामना करतंय. या संकटावर मात करण्याच्या लढाईत कोरोनाची लस हा एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. भारतानं स्वतःच्या दोन लसींची निर्मिती केलीय. भारतातील लसीकरणाचा वेगदेखील विक्रमी असून अमेरिकेखालोखाल भारतानं लसीकरणाच्या बाबतीत विक्रम नोंदवला आहे. हा वेग कित्येक पटींनी वाढू शकतो, असा विश्वास प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी व्यक्त केलाय.

    केंद्र सरकारने जर खासगी कंपन्यांना लसीकरणाच्या मोहिमेची जबाबदारी दिली, तर अधिक वेगानं कोरोना लसीकरण होऊ शकेल, असं मत प्रसिद्ध उद्योगपती असीम प्रेमजी यांनी व्यक्त केलंय. मोदी सरकारने कोरोना लसीच्या वितरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केलीय. सरकारची कार्यपद्धती वेगवान आणि प्रभावशाली असून जर यात खासगी कंपन्यांची मदत घेतली, तर अधिक परिणामकारकरित्या हे काम करता येऊ शकेल, असं प्रेमजी यांनी म्हटलंय. बेंगलोर चेंबर ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्सच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

    आपण सीरम संस्थेला प्रत्येक लसीसाठी ३०० रुपये आणि नर्सिंग आणि हॉस्पिटल सुविधेसाठी लसीमागे १०० रुपये देऊ शकतो, अशी कल्पना प्रेमजी यांनी सुचवलीय. अशा प्रकारे ४०० रुपये दराने प्रत्येकाचं लसीकरण करता येऊ शकतं. सरकारनं जर खासगी क्षेत्राला यात सहभागी केलं, तर ६० दिवसांत म्हणजेच केवळ दोन महिन्यांत ५० कोटी नागरिकांना लसीकरण करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

    कोरोनानं लोकांचं आणि उद्योगांचंही आयुष्य बदलून टाकल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. कोरोना काळात ९० टक्के लोक घरून काम करत होते. आजही तेवढेच लोक घरून काम करू शकतात. आता घरून काम करायचं आणि कार्यालयात जायचं याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य कंपन्या आणि कर्मचारी दोघांनाही असल्याचं ते म्हणाले. कोरोनामुळे घरून काम करणे शक्य असून ते सर्वांच्याच सोयीचं असल्याचा नवा साक्षात्कार झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.