मोठी बातमी! | कर्नाटकात गृहमंत्र्यांना मिळाली बढती, बसवराज बोम्मई नवे मुख्यमंत्री ; आज होणार शपथविधी | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
इतर राज्ये
Published: Jul 28, 2021 08:00 AM

मोठी बातमी!कर्नाटकात गृहमंत्र्यांना मिळाली बढती, बसवराज बोम्मई नवे मुख्यमंत्री ; आज होणार शपथविधी

कर्नाटकात गृहमंत्र्यांना मिळाली बढती, बसवराज बोम्मई नवे मुख्यमंत्री ; आज होणार शपथविधी

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई यांची निवड करण्यात आली असून आज २८ जुलै (बुधवार) दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राज्याचे गृहमंत्री बसवराज आता आजपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळणार आहेत.

    बंगळुरु :  मागील दोन महिन्यांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असणाऱ्या राजकीय नाट्यानंतर कर्नाटकला नवे मुख्यमंत्री लाभले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी काल राजीनामा दिल्यानंतर आज त्यांची जागी बसवराज बोम्मई (Basavaraj S Bommai) यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री आणि निरीक्षक धर्मेंद्र प्रधान यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

    कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई यांची निवड करण्यात आली असून आज २८ जुलै (बुधवार) दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राज्याचे गृहमंत्री बसवराज आता आजपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळणार आहेत.

    बसवराज बोम्मई नेमके कोण आहेत?

    बसवराज बोम्मई हे बी.एस. येडियुरप्पा यांच्यासारखेच ताकदवान लिंगायत नेते आहेत. ते येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, येडियुरप्पा यांनी लिंगायत समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करु नये, असं म्हटलं होतं. बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस आर बोम्मई यांचे पुत्र आहेत. बोम्मई यांनी जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

    राजीनामा देताना काय म्हणाले येडियुरप्पा?

    कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच ते झाले पाहिजे. बंगळुरु हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे, अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या आहेत.

    तुम्हाला कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत काय वाटते ? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…

    Comments

    शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं संभ्रम निर्माण होतोय का?

    View Results

    Loading ... Loading ...
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.