दररोज आंघोळ केल्याचे मोठे दुष्परिणाम, आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक, संशोधक काय म्हणतात? : जाणून घ्या सविस्तर

लहानपणापासून आपल्याला शरीर स्वच्छ राहण्यासाठी रोज आंघोळ करावी असं सांगितलं जातं. रोज आंघोळ केल्याने निम्माहून अधिक आजार दूर राहतात, असं आपल्याला घरातील मोठ्या व्यक्ती सांगतात. परंतु, याबाबत वैज्ञानिकांचं मत जरा वेगळं आहे. दरम्यान त्यांच्या म्हणण्यानुसार, रोज आंघोळ करणं आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकतं. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती..

  नवी दिल्ली : लहानपणापासून आपल्याला शरीर स्वच्छ राहण्यासाठी रोज आंघोळ करावी असं सांगितलं जातं. रोज आंघोळ केल्याने निम्माहून अधिक आजार दूर राहतात, असं आपल्याला घरातील मोठ्या व्यक्ती सांगतात. परंतु, याबाबत वैज्ञानिकांचं मत जरा वेगळं आहे.

  दरम्यान त्यांच्या म्हणण्यानुसार, रोज आंघोळ करणं आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकतं. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती..

  संशोधक काय सांगतात ?

  संशोधकांच्या मते, आंघोळ झाल्यानंतर आपली त्वचा उबदार आणि कोरडी होती. यामुळे जीवाणू आणि अॅलर्जिक गोष्टींना निमंत्रण मिळू शकते. यामुळे त्वचेचा संसर्ग किंवा अॅलर्जिक रिअॅक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टर लोकांना अंघोळीनंतर स्किन क्रिम वापरण्याचा सल्ला देतात. हॉर्वर्ड हेल्थच्या एका अहवालानुसार, सर्वसामान्यपणे हेल्दी स्किन त्वचेवर तेलकटपणा आणि चांगले जीवाणूंचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे काम करते. आंघोळीवेळी त्वचा घासली जाते, त्यामुळे तेलकटपणा आणि चांगले जीवाणू त्वचेवरुन निघून जातात. गरम पाण्याने आंघोळ केल्यास अधिक नुकसान होते.

  आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, शरीरात अँटीबॉडी तयार होण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणेला कॉमन बॅक्टेरिया, घाण, आणि सूक्ष्म जीवांची गरज असते. त्यामुळेच लहान बालकांना दररोज आंघोळ घालू नये, असा सल्ला डॉक्टर्स किंवा डर्मेटोलॉजिस्ट देतात. कारण सातत्याने आंघोळ केल्यास रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

  आंघोळीच्या वेळी आपण जर अॅण्टी बॅक्टेरिअल शॅम्पू किंवा साबण वापरला तर चांगले जीवाणू मृत होतात. हॉवर्ड हेल्थच्या म्हणण्यानुसार, यामुळे त्वचेवर बॅक्टेरियाचे संतुलन बिघडते. यामुळे फारशा उपयुक्त नसलेल्या बॅक्टेरियाची वाढ होण्याचा धोका असतो. हे बॅक्टेरिया जे प्रतिजैविकांना अधिक प्रतिरोधक असतात. अमेरिकेतील प्रसिध्द डर्मेटोलॉजिस्ट डॉ. लॉरेन प्लाच यांच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तींना त्वचेशी संबंधित आजार आहेत किंवा ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी 5 मिनिटांपेक्षा अधिक काळ आंघोळ करणं टाळावं. अशा लोकांनी एकावेळी 1 मिनिटापेक्षा अधिक वेळ शॉवरखाली थांबणं टाळावं. या दोन्ही गोष्टी त्वचा आणि केसांसाठी नुकसानदायी ठरु शकतात.

  एका अहवालानुसार, जर तुम्हाला त्वचेशी निगडीत काही समस्या नसेल तर तुम्ही दररोज साबणाचा वापर करु शकता. परंतु, जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही दररोज साबणाचा वापर टाळावा. साबणामुळे तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेलकटपणा कमी होऊन त्वचा कोरडी पडू लागते. एनबीसी न्यूजच्या एका वृत्तानुसार, गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील नैसर्गिक तेलकटपणा वेगाने कमी होत जातो. यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. चांगल्या रक्तप्रवाहासाठी काही लोक प्रमाणापेक्षा अधिक थंड किंवा गरम पाण्याने आंघोळ करतात. मात्र योग्य तापमानानुसार पाण्याचा वापर करणे हे हितावह असते.

  डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो

  तज्ज्ञांच्या मते, गरम पाण्याने आंघोळ केल्यास डोळ्यांची आर्द्रता कमी होते. यामुळे डोळ्यांना खाज सुटू लागते. अशावेळी आंघोळीसाठी गरम किंवा गार पाण्याऐवजी नॉर्मल पाण्याचा वापर करावा.

  तसेचं तज्ज्ञांच्या म्हणण्याचा विचार करता, हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने (Hot Water) आंघोळ करणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. यामुळे आपल्या मेंदू आणि शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. गरम पाण्यामुळे त्वचेवरील केराटिन नावाच्या त्वचेच्या पेशी नष्ट होतात. यामुळे त्वचेला खाज, कोरडेपणा आणि चट्टे उठणे अशा समस्या निर्माण होतात.