Before his eyes the people plundered the crops of his field; But still the farmer remained silent

पाटणा : बिहारच्या समस्तीपूर मध्ये एका शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर लोकांनी त्याच्या शेतात घुसून त्याच्या शेतातील कोबी उचलून नेले. मात्र, या शेतकऱ्याने कुणालाही अडवले नाही. मुक्तापूरचे शेतकरी ओम प्रकाश यादव यांच्या कोबीच्या शेतीत फायदा नाही तर नुकसान झाल्याने निराश होते.

पत्ता कोबीच्या पिकाला रास्त भाव न मिळाल्याने हताश होवून हातात आलेल्या उभ्या पिकावर यादव यांनी ट्रॅक्टर फिरवला. कोबीच्या शेतीसाठी चार हजार रुपये प्रती कट्टा येत आहे. पण बाजारात त्याला बाजारात एक रुपये किलोही भाव मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

त्यामुळे नाराज आणि हताश होऊन त्यांनी आपल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला. यादव यांना कोबीच्या शेतात ट्रॅक्टर चालवताना बघून आजुबाजूचे लोक धावत आले आणि कोबी उचलून घेवून गेले. पिकाला किंमत न मिळाल्याने लोकांना त्याचं पीक लुटून नेताना बघूनही यादव शांत राहिले.