संसार फुलण्या आधीच … नियतीने होत्याचे नव्हते केले; पाणावलेल्या डोळ्यांनी दिला शहीद अभिनव चौधरीना निरोप

भिनव आणि सोनिका यांचा विवाह २५ डिसेंबर २०१९ ला झाला होता. त्यावेळी सोनिका फ्रान्समध्ये शिकत होत्या. त्यामुळे लग्नानंतर अभिनव पठानकोट आणि सोनिका परत फ्रान्सला गेली होती. गेल्यावर्षीच सोनिका परतली होती. त्यावेळी अभिनवही सुट्टी घेऊन मेरठला आला होता. त्यानंतर दोघं सोबच सूरतगडला गेले होते. या महिन्यात दोघे परत येणार होते, पण त्याआधीच नियतीने होत्याचे नव्हते केले .

    मेरठ: पंजाबमध्ये भारतीय हवाईदलाचे लढाऊ विमान मिग-२१ क्रॅश (Mig 21 Crash) झाल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत शहीद स्क्वॉड्रन लीडर अभिनव चौधरी यांच्या कुटुंबियांना या मोठा धक्का बसला आहे. अभिनव यांचे पार्थिव घरी आणले तेव्हा आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृतदेहपाहून अभिनव यांच्या आईची शुद्ध हरपली तर पत्नीची अवस्था पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

    अभिनव यांचा वडिलांनी मुलाचा आवडता टी शर्ट परिधान करत त्याला अंतिम सलामी दिली. तो त्याच्या मिलिट्री कॉलेजचा टी शर्ट होता. अभिनवचे वडील रोज सायंकाळी मुलाच्या फोनची वाट पाहत असायचे. अभिनव रोज सायंकाळी फोन करून त्यांना तो ठीक असल्याचं सांगत होता. आता मुलालाच खांदा देण्याची वेळ आली आहे. मला रोज सायंकाळी फोन करून मी ठीक आहे असे कोण सांगणार असे म्हणत वडील सतेंद्र चौधरीनी आपल्या अश्रूंना बांध मोकळा करुन दिला.

    अभिनव आणि सोनिका यांचा विवाह २५ डिसेंबर २०१९ ला झाला होता. त्यावेळी सोनिका फ्रान्समध्ये शिकत होत्या. त्यामुळे लग्नानंतर अभिनव पठानकोट आणि सोनिका परत फ्रान्सला गेली होती. गेल्यावर्षीच सोनिका परतली होती. त्यावेळी अभिनवही सुट्टी घेऊन मेरठला आला होता. त्यानंतर दोघं सोबच सूरतगडला गेले होते. या महिन्यात दोघे परत येणार होते, पण त्याआधीच नियतीने होत्याचे नव्हते केले .