पश्चिम बंगालमध्ये भाजपात पडणार फूट? नेते पुन्हा टीएमसीत परत येण्याच्या तयारीत, मोदींचा मुकुल रॉय यांना फोन

भाजपाला पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यामुळे तृणमूल काँग्रेसमधून भाजपात गेलेले नेते आता पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परत येण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले, पण सध्या विरोधी बाकांवर बसणारे हे नेते पुन्हा एकदा मूळ पक्षात परत येण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत असून भाजपात दाखल झालेले मुकुल रॉय हे सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतायत. 

  गेले काही महिने पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि शह-काटशहाच्या राजकारणाचा धुरळा उडाल्यानंतर पुन्हा एकदा ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. मात्र अद्यापही बंगालमधील राजकीय धुळवड शमण्याचं नाव घेत नाहीय. बंगालमधील भाजप आता फुटीच्या उंबरठ्यावर असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुकुल रॉय यांना फोन केल्याची माहिती आहे.

  बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून भाजपात गेलेले नेते पुन्हा तृणमूलमध्ये परत येतील का?

  View Results

  Loading ... Loading ...

  भाजपाला पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यामुळे तृणमूल काँग्रेसमधून भाजपात गेलेले नेते आता पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परत येण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले, पण सध्या विरोधी बाकांवर बसणारे हे नेते पुन्हा एकदा मूळ पक्षात परत येण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत असून भाजपात दाखल झालेले मुकुल रॉय हे सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतायत.

  मुकुल रॉयना मोदींचा फोन

  मुकुल रॉय यांच्या पत्नी कृष्णा रॉय यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झालाय. त्यांच्यावर कोलकात्यातील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ममता बॅनर्जींचे विश्वासू अभिषेक बॅनर्जी हे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यानंतर मुकुल रॉय आता मूळ पक्षात परत येतील, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर काही वेळातच स्वतः पंतप्रधान मोदींनी मुकुल रॉय यांना फोन करून कृष्णा रॉय यांच्या तब्येतीची विचारपूस करत लागेल ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं.

  कोण आहेत मुकुल रॉय?

  मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमधील ममता बॅनर्जींचे विश्वासू आणि नंबर दोनचे नेते मानले जात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होण्यापूर्वी ममता बॅनर्जी या रेल्वेमंत्री होत्या. जेव्हा त्यांनी रेल्वेमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा या पदाची जबाबदारी त्यांनी मुकुल रॉय यांच्याकडे दिली होती. बंगालमधून दोनदा ते राज्यसभेवरही निवडून गेले. त्यानंतर मात्र ममता बॅनर्जींसोबत त्यांचे मतभेद झाले आणि सहा वर्षांसाठी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. मग त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.