chaudhary mukesh singh chaturvedi

आपले देवता सुद्धा मद्यप्राशन करीत होते. मी स्वत: मृत्युंजयमध्ये याबाबत वाचले आहे. महाभारत युद्धाची घोषणा झाल्यानंतर आयुध सामुग्री तसेच दारूचे (liquor) उत्पादन वाढविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे या परंपरा पुरातन काळापासून चालत आहे, असे भाजपाचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष चौधरी मुकेश सिंह चतुर्वेदी(choudhary mukesh singh chaturvedi) म्हणाले आहे.

ग्वाल्हेर : राज्यात दारू विक्रीवरून(alcohol sale) रणकंदन सुरू असतानाच भाजपा नेत्याने केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. आपले देवता सुद्धा मद्यप्राशन करीत होते. मी स्वत: मृत्युंजयमध्ये याबाबत वाचले आहे. महाभारत युद्धाची घोषणा झाल्यानंतर आयुध सामुग्री तसेच दारूचे (liquor) उत्पादन वाढविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे या परंपरा पुरातन काळापासून चालत आहे, असे भाजपाचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष चौधरी मुकेश सिंह चतुर्वेदी(choudhary mukesh singh chaturvedi) म्हणाले आहे.

जनतेला दिला सल्ला
प्रदेश उपाध्यक्षपदावर वर्णी लागल्यानंतर पहिल्यांदाचा ग्वाल्हेर येथे आलेल्या चतुर्वेदी यांनी समाजमाध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी जनतेलाही सल्ला दिला. ते म्हणाले की, शुद्ध दारू मिळायला पाहिजे. तसेच किती प्यावी याची सुद्धा मर्यादा पाहिजे. आत्म शिस्तीचे पालन तर व्यक्तीला स्वत: करावे लागेल. कारण ही परंपरा पुरातन काळापासून सुरू असून वेळ आणि मर्यादेचे भान ठेऊन मद्यप्राशन केले पाहिजे.