Uttarakhand Chief Minister

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री(New Chief Minister Of Uttarakhand) म्हणून पुष्कर सिंह धामी(Pushkar singh Dhami) यांची निवड करण्यात आलेली आहे, ते खटीमा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत.

    उत्तराखंडचे(Uttarakhand) मुख्यमंत्री तिरथसिंह रावत (Tirathsing Rawat) यांनी शुक्रवारी रात्री राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. शुक्रवारी भाजप पक्षश्रेष्ठींनी रावत यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री(New Chief Minister Of Uttarakhand) म्हणून पुष्कर सिंह धामी(Pushkar singh Dhami) यांची निवड करण्यात आलेली आहे, ते खटीमा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ४५ वर्षीय धामी हे उत्तरखंडचे सर्वात तरूण मुख्यमंत्री असणार आहेत.

    उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर पुष्कर सिंह धामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदारीमुळे मी स्वतःला भाग्यवान समजत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    दरम्यान पुष्कर सिंह धामी यांची उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर  त्यांच्या घराजवळ जल्लोषाचे वातावरण बघायला मिळाले.

    आज (शनिवार) भाजपा आमदारांच्या झालेल्या बैठकीत पुष्कर सिंह धामी यांची उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून सर्वानुमते निवड केली गेली. अगोदर ठरल्यानुसार आजच धामी यांचा शपविधी होणार होता. मात्र नंतर या कार्यक्रमात बदल करण्यात आला व आता उद्या (रविवार) त्यांचा शपथविधी असणार आहे.