गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची निवड

आज गुजरातमध्ये भाजपाच्या दीर्घकाळ चाललेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र रजनीकांत पटेल यांची मुख्यमंत्रीपदी एकमताने निवड करण्यात आली. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोमवारी म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

    गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी यामागील नक्की कारण काय आहे. हे प्रसार माध्यमांच्या समोर सांगितलं होतं. त्यानंतर पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. परंतु या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

    आज गुजरातमध्ये भाजपाच्या दीर्घकाळ चाललेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र रजनीकांत पटेल यांची मुख्यमंत्रीपदी एकमताने निवड करण्यात आली. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोमवारी म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

    केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची घोषणा पक्षाच्या बैठकीमध्ये केली आहे. भूपेंद्र पटेल हे घाटलोदिया मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.