bhupendra patel

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये(Political Changes In Gujarat) फेरबदलाचे वारे सुरु आहेत. विजय रुपाणी(Vijay Rupani) यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता भूपेंद्र पटेल(Bhupendra Patel Took Oath As New Chief Minister Of Gujarat) यांनी आज गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विजय रुपाणींच्या नंतर रविवारीच पक्षाने भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र अन्य कोणताही मंत्री बदलण्यात आला नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ तसेच राहील. फक्त मुख्यमंत्री बदलले आहेत.


    आज गांधीनगर येथील राजभवन येथे एका कार्यक्रमात भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई  उपस्थित होते.

    भूपेंद्र पटेल हे पाटीदार समाजातून आले आहेत. त्यामुळे भाजपाने निवडणुकीपूर्वी राज्यातील या प्रमुख समाजाला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला आहे.