सायकल रिपेअरिंगवाला ते आसाराम बापू आणि लैगिंक शोषण ते थेट कारागृह; वाचा कसा लागला आसारामच्या साम्राज्याला सुरुंग

आसारामनी सुरुवातीला सायकलच्या दुकानात सायकल रिपेअरिंगचं काम केलं. त्यानंतर टांगा चालवून पोट भरण्यास सुरुवात केली. पण हा मुलगा बघता बघता आसुमलचा आसाराम झाला. आसारामने त्याच्या चरित्रात इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण घेतल्याचं म्हटलं आहे.

    जोधपूर: लैंगिक शोषण प्रकरणात जोधपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची तब्येत अचानक बिघडली आहे. हृदयविकाराचा झटका आणि प्रकृती खाल्यावल्यामुळे आसारामला महात्मा गांधी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु आसारामचा प्रवास हा सायकल रिपेअरिंगवाला ते संपूर्ण जगभरात आश्रमांच साम्राज्य उभारण्यापर्यंत आहे. एकेकाळी प्रचंड ऐश्वर्यात राहणाऱ्या आसारामच्या आश्रमात देशातील अनेक बडे राजकारणी आणि उद्योगपती हजेरी लावायचे. देशभर त्यांचे लाखो अनुयायी होते. पण गंभीर गुन्ह्यात नाव आल्यानंतर आसुमल थाउमल हरपलानी ऊर्फ आसारामच्या साम्राज्याला सुरुंग लागला आणि सर्व काही संपुष्टात आलं.

    सायकल रिपेअरिंग ते टांगावाला

    आसारामनी सुरुवातीला सायकलच्या दुकानात सायकल रिपेअरिंगचं काम केलं. त्यानंतर टांगा चालवून पोट भरण्यास सुरुवात केली. पण हा मुलगा बघता बघता आसुमलचा आसाराम झाला. आसारामने त्याच्या चरित्रात इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण घेतल्याचं म्हटलं आहे. आसारामच्या मित्रांच्या मते, त्याने तरुण वयात कच्छचे सिंधी संत लीला शाह बाबाचा अनुयायी बनणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जिद्दी आणि मनमौजी स्वभावामुळे बाबांनी त्यांना अनुयायी म्हणून स्वीकारले नाही.

    ७०च्या दशकात त्याने अहमदाबादपासून १० किलोमीटर अंतरावर एका गावात आपला आश्रम सुरू केला. त्यानंतर त्याचं साम्राज्य हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली. जून २०१६मद्ये आयकर विभागाने आसारामची अघोषित संपत्ती २३०० कोटी असल्याचं स्पष्ट केलं होतं. आसारामचे जगभरात ४०० आश्रम आहेत. यातील काही आश्रम जबरदस्तीने हडप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या आश्रमांच्या भूखंडाचा वाद सुरू आहे. कोर्टात अनेक आश्रमांची प्रकरणे प्रलंबित आहेत. असे सांगितलं जात आहे.

    साम्राज्याला असा पडला सुरूंग

    ऑगस्ट २०१३ पासून आसारामच्या पतनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. उत्तर प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीने कुटुंबासोबत जाऊन दिल्ली पोलिसात आसाराम विरोधात गुन्हा दाखल केला होता. आसारामने शारीरिक शोषण केल्याचा आरोप या मुलीने केला होता. त्यानंतर २५ एप्रिल २०१८ रोजी आसाराम विरोधातील आरोप सिद्ध होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.