बंगालमध्ये ममता बँनर्जींना मोठा धक्का, ५ आमदारांची तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी ; भाजपची ताकद पणाला…

ममता बॅनर्जी यांच्या सर्वात निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सहकारी आणि चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या सोनाली गुहा आणि रवींद्रनाथ भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच चार वेळा निवडून आलेले आमदार जतू लाहिरी आणि माजी फुटबॉलपटू दीपेन्दू विश्वास यांना सुद्धा तृणमूल काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनाही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकींचे वारे वाहत आहेत. अशातच निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने सुद्दा आपली ताकद पणाला लावली आहे. ओपिनियन पोलमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार पुन्हा एकदा येणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु राजकीय रणधुमाळी पाहिली असता, तृणमूल काँग्रेसच्या पाच आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    ममता बॅनर्जी यांच्या सर्वात निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सहकारी आणि चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या सोनाली गुहा आणि रवींद्रनाथ भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच चार वेळा निवडून आलेले आमदार जतू लाहिरी आणि माजी फुटबॉलपटू दीपेन्दू विश्वास यांना सुद्धा तृणमूल काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनाही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    जिल्हा परिषद भाजपच्या नियंत्रणाखाली

    मालदा जिल्हा परिषदेतील २२ सदस्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने ३८ सदस्य असलेली ही जिल्हा परिषद भाजपच्या नियंत्रणाखाली आली आहे. दुसरीकडे बंगाली अभिनेत्री तनुश्री चक्रवर्ती यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी तृणमूल काँग्रेस सरकारविरुद्ध अपप्रचार करून अफवा पसरवत असल्याबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी मोदींना फटकारले. एक दिवस देशाला नरेंद्र मोदी यांचे नाव दिले जाईल आणि तो दिवसही दूर नाही, असा निशाणाही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला.