काँग्रेसचा मोठा निर्णय; पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर नवज्योतसिंह सिद्धूंची वर्णी

पंजाब मध्ये सध्या अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. काॅंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रविवारी माजी क्रिकेटपटू आणि काॅंग्रेसचे नेते नवज्योत सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा आक्षेप असूनही पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे.

    चंदीगड : पंजाब मध्ये सध्या अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. काॅंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रविवारी माजी क्रिकेटपटू आणि काॅंग्रेसचे नेते नवज्योत सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा आक्षेप असूनही पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमध्ये सध्या नेत्यांचे बदलते वारे दिसत आहेत. नवज्योतसिंह सिद्धू हे सुनील जाखड यांची जागा घेतील. सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार काँग्रेसने पंजाब काँग्रेस समितीवर चार कार्यकारी अध्यक्ष देखील नेमले आहेत.

    दरम्यान सिद्धू यांच्यासह संगतसिंग, सुखविंदरसिंग, पवन गोएल, कुलजितसिंग यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवज्योत सिद्धू यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देताना कुलजीतसिंह नागरा यांना सिक्कीम, नागालँण्ड आणि त्रिपुराच्या एआयसीसीच्या अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे.

    काय घडलं नेमकं ?

    अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून काढण्यात आलेल्या पत्रकावर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, नवज्योतसिंह यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देताना कुलजीतसिंह नागरा यांना सिक्कीम, नागालँण्ड आणि त्रिपुराच्या एआयसीसीच्या अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. नवज्योतसिंह सिद्धू हे नाराज होते. त्यामुळे त्यांची नाराजी काँग्रसकडून दूर केली जाईल, अशी शक्यता होती. तसेच त्यांच्यावर पंजाब राज्यात मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी चर्चा होती. आता त्यांना पंजाब प्रदेशचे अध्यक्षपद सोपविण्यात आल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

    शुक्रवारीच सिद्धू यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत उपस्थित होते.