UP एटीएसचा मोठा खुलासा; विदेश फंडिंगच्या आधारे धर्मांतर

ही टोळी आर्थिक कमकुवत महिला व दिव्यांगांना विशेष करून मूकबधिरांना फूस लावून त्यांच्या इच्छेविरोधात धर्मांतरण करीत होते. धर्मांतरीत व्यक्तीला कट्टर विचारसरणीशी जोडून त्यांना त्यांच्या मूळधर्माच्या अन्य लोक, मित्र तसेच नातेवाईकांच्या धर्मांतराची जबाबदारी दिली जात होती. धर्मांतर केलेली व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत मूळधर्मात परत जाऊ नये यासाठी वेळोवेळी कार्यशाळा व अवैध धर्मांतर करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. एटीएसने चार्जशीटमध्ये दावा केला आहे की, अवैध धर्मांतरणाच्या कार्यवाहीने विभिन्न धर्मांत आपसी वैमनस्य व कटुता वाढणे व देशविरोधी विचारसरणीला जुळल्याचे पुरावे मिळाले आहेत.

  लखनौ : उत्तरप्रदेश एटीएसने अवैध धर्मांतरणाच्या प्रकरणात उमर गौतमसहित 6 आरोपींविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. उमर गौतम व त्याचे साथीदार देशातील लोकसंख्या बिघडविण्यासाठी देशी व विदेशी फंडिंगच्या मदतीने मोठ्या प्रमाणात अवैध धर्मांतर करत होते, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 10 लोकांना अटक करण्यात आली असून त्यातील 6 जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

  युपी एटीएसनुसार उमर गौतम, जहांगीर आलम, मन्नू यादव उर्फ अब्दुल्ल मन्नान, राहुल भोला उर्फ राहुल अहमद, इरफान शेख व सलाहुद्दीनच्या विरोधात विशेष मुख्य न्यायदंडाधिकारी (कस्टम)यांच्याकडे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एटीएसनुसार, विवेचनात त्यांच्याविरोधातील पर्याप्त पुराव्यांच्या आधारावर त्यांनी देशव्यापी अवैध धर्मांतराचे संचालन केल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणाचे संबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर जुळले आहेत.

  मूळधर्मात न परतण्यासाठी वर्कशॉप

  ही टोळी आर्थिक कमकुवत महिला व दिव्यांगांना विशेष करून मूकबधिरांना फूस लावून त्यांच्या इच्छेविरोधात धर्मांतरण करीत होते. धर्मांतरीत व्यक्तीला कट्टर विचारसरणीशी जोडून त्यांना त्यांच्या मूळधर्माच्या अन्य लोक, मित्र तसेच नातेवाईकांच्या धर्मांतराची जबाबदारी दिली जात होती. धर्मांतर केलेली व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत मूळधर्मात परत जाऊ नये यासाठी वेळोवेळी कार्यशाळा व अवैध धर्मांतर करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. एटीएसने चार्जशीटमध्ये दावा केला आहे की, अवैध धर्मांतरणाच्या कार्यवाहीने विभिन्न धर्मांत आपसी वैमनस्य व कटुता वाढणे व देशविरोधी विचारसरणीला जुळल्याचे पुरावे मिळाले आहेत.

  दिल्ली, गाजियाबाद, नोएडामध्ये पसरले जाळे

  या अवैध कामे करण्यासाठी दिल्ली येथील इस्लामिक दावा सेंटर (आयडीसी), गाजियाबाद (मसुरी)च्या धार्मिक स्थळ व नोएडा डेफ सोसायटीला औपचारिक केंद्र बनवून संपूर्ण भारतात याचे जाळे पसरविण्यात आले आहे.
  हवालाच्या माध्यमातून पैसा

  अवैध धर्मपरिवर्तनासाठी परदेशात बसलेले त्यांच्या सहकाऱ्यांद्वारे मोठ्या प्रमाणात हवालाच्या माध्यमातून उमर गौमला दावा (इस्लाम स्वीकारण्यासाठीचे निमंत्रण)संबंधित धर्मपरिवर्तसाठी पैसे पाठवून सहायता करण्यात येत होती. उमर गौतमद्वारे हा पैसा अवैध पद्धतीने आपल्या साथीदारांना पाठविण्यात येत होते.