woman found after 2 years

बिहारमध्ये(bihar) एका महिलेचा आपल्या पतीसोबत वाद झाल्यावर ती रागावून माहेरी गेली. काही दिवसानंतर ती गायब (missing) झाली. यादरम्यानच एका कालव्याजवळ एक मृतदेह(dead body) मिळाला. माहेरच्यांनी तो मृतदेह आपल्या मुलीचा आहे समजून अंत्यसंस्कारसुद्धा केले. मात्र २ वर्षांनी ती महिला जिवंत असल्याचे(woman found alive after 2 years) उघड झाले आहे.

    कैमूर: बिहारमध्ये(bihar) एक विचित्र घटना समोर आली आहे. एका महिलेचा आपल्या पतीसोबत वाद (husband and wife dispute)झाल्यावर ती रागावून माहेरी गेली. काही दिवसानंतर ती गायब(missing) झाली. यादरम्यानच कैमूरजवळ देवराढ कला या ठिकाणच्या कालव्याजवळ एक मृतदेह मिळाला. या मृतदेहाची ओळख पटली नाही. मात्र माहेरच्या लोकांनी चप्पल, कपडे आणि रुमालावरून या मृतदेह आपल्या मुलीचा असल्याचे म्हटले. माहेरच्या लोकांनी अंत्यसंस्काराचे विधीही उरकले. मात्र तब्बल २ वर्षांनी ही महिला जिवंत असल्याचे समजले आहे.

    मृत महिलेचा खून झाला असे समजून सासरच्या लोकांच्या विरोधात माहेरच्या लोकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करताना महिला जिवंत असल्याचे पुरावे सापडायला लागले. पोलिसांनी तपास पुढे नेल्यावर विवाहित महिला दुसऱ्या माणसासोबत सापडली. उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातून (Uttar Pradesh Sonbhadra District) या दोघांना दोन वर्षांनी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रेमी महिलेचा भावजी लागतो. या दोघांचे पूर्वीपासून प्रेमसंबंध होते. त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. त्यांना २ मुलंही आहेत.

    या महिलेनं सांगितलं की, तिचा आधीचा पती तिला नेहमी मारायचा. त्यामुळे ती माहेरी आल्यावर तिचे आणि भावोजींचे प्रेम प्रकरण सुरु झाले. मग त्यांनी लग्न केले. माहेरच्यांनी महिलेला मृत समजून २०१८ मध्ये या महिलेवर अंत्यसंस्कारही केले होते.