चित्रकूटमधील ‘या’ ७ गुरुमंत्राच्या आधारे भाजप व केंद्र सरकार आखणार आपली रणनीती ; जाणून घ्या काय आहेत मुद्दे

जगद्गुरूंनी संघ प्रमुखांना गुरुमंत्र म्हणून ७ मुद्दे दिलेले यामध्ये अगदी धर्मपरिवर्तनापासून ते लोकसंख्या प्रतिबंधवरील कायद्यापर्यंतच्या अनेक विषयांचा समावेश आहे.

  राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या चित्रकूटमध्ये सुरू असलेल्या बैठकीचा आजचा शेवटचा दिवस आहे. या बैठकीमध्ये तयार केलेल्या ब्लू प्रिंटच्या आधारे भाजप व केंद्र सरकारला आपली रणनीती आखात पुढे जाणे क्रमप्राप्त ठरणार आहे. बैठकीतील विचार मंथनानंतर केंद्र सरकार निश्चितपणे काही मोठे निर्णय घेऊ शकते.

  चित्रकूट येथे चाललेल्या विचार मंथनाच्या बैठकीत संघप्रमुख मोहन भागवत यांनी जगद्गुरूं रामभद्राचार्य यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. त्यावेळी जगद्गुरूंनी संघ प्रमुखांना गुरुमंत्र म्हणून ७ मुद्दे दिलेले यामध्ये अगदी धर्मपरिवर्तनापासून ते लोकसंख्या प्रतिबंधवरील कायद्यापर्यंतच्या अनेक विषयांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या मुद्द्यांचा निश्चितच विचार होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. जगद्गुरूंनी गुरुमंत्र म्हणून दिलेले सात मुद्दे नेमके काय ते पाहा सविस्तर

  १) जम्मू-काश्मीर
  जम्मू-काश्मीर राज्यात निवडणुका घेण्याच्या दृष्टीकोनातून बैठका सुरू आहेत. जगद्गुरू म्हणाले की, संपूर्ण काश्मीर अर्ध्या पूर्ण काश्मीरचा नाही तर भारताच्या नकाशामध्ये सामील झाला पाहिजे.

  २) धर्म बदल
  उत्तरप्रदेश राज्यात आजही धर्मांतर होत असल्याच्या घटना घडत आहेत, हे तात्काळ थांबले पाहिजे धर्मां करणाऱ्यावर कारवाई सुरू केली आहे. परंतु यावर केंद्राने कठोर कायदे केले पाहिजेत आणि हे काम लवकरात लवकर व्हायला हवे असे मत रामभद्राचार्य यांनी व्यक्त केले आहे.

  ३) लोकसंख्या नियंत्रण
  देशातील मुस्लिम समुदायाची झपाट्याने वाढत चालेली आहे तर दुसरीकडे त्या प्रमाणात हिंदूची संख्या कमी होत आहे. यासर्व गोष्टी लक्षात घेऊन लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात कायदा लवकरात लवकर करण्यात यावा. असेही रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे.

  ४) गायीचे संरक्षण
  हिंदू धर्मामध्ये धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या व पवित्र मानल्या जाणाऱ्या गायीच्या संरक्षणाचीही चिंता व्यक्त करण्यात आली असून गाईच्या संरक्षणासाठी गोहत्याबंदीवर संपूर्ण बंदी घालण्यात यावी असेही त्यांनी सुचवाले आहे.

  ५) समान नागरी कायदा

  समान नागरी संहिता त्वरित लागू करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांच्या धर्माचा विचार न करता देशात कायदा असावा.

  ६) हिंदी  राष्ट्रभाषा
  हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी, असे रामभद्राचार्य यांनी मोहन भागवत यांना सांगितले.तसेच विचारमंथनाच्या वेळी या विषयावर चर्चाही केली.

  ७) रामायण
  रामायणाला राष्ट्रीय ग्रंथ बनवण्यात यावे. यासाठी संघाच्यापदाधिकाऱ्यांनी यासाठी भूमिका घ्यावी व केंद्र सरकारने यासाठी तात्काळ पावले उचलावी असे मत रामभद्राचार्य यांनी व्यक्त केले आहे.