amit shah in hyderabad

मिदनापूर : बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड खालसा करण्यासाठी भाजपाने मास्टर प्लानच बनवल्याचे दिसत आहे. यासाठी अमित शाह हे दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आहेत.

ममतांचे खास असलेले शुभेंदू अधिकारी यांना आपल्याकडे वळवण्यात भाजपला यश आले आहे. शुभेंदू अधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वीच पक्ष आणि विधानसभेचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते भाजपमध्ये प्रवेश घेतील अशी शक्यता वर्तवली जात होती.

अखेर शनिवारी त्यांनी शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय खासदार सुनील मंडल आणि ९ आमदारही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी पाच आमदार तृणमूल काँग्रेसचे आहेत. दरम्यान, शुभेंदूचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही.

या पक्ष प्रवेशानंतर बोलताना अमित शहा यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला. ‘सर्व पक्षांमधील चांगले लोक आज भाजपमध्ये आले आहेत. निवडणूक येईपर्यंत दीदी (ममता बॅनर्जी) एकट्याच राहतील असा घणाघात शहा यांनी केला.