आत्महत्येचा प्रयत्न करता? माफी मागा, बिजू जना दलाची मागणी, भाजप आणि काँग्रेसचा अभूतपूर्व गोंधळ

आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा असून आमदार पाणीग्राही यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी बिजू जनता दलाच्या वतीनं करण्यात आली. पाणीग्राही यांच्या कृत्यामुळं चुकीचा संदेश जनतेत गेला असून त्यांनी तातडीनं माफी मागणं गरजेचं असल्याचं बिजू जनता जलानं म्हटलंय. त्यावर, शेतकऱ्यांना तांदळाला भाव द्या आणि मग माफीची मागणी करा, असं प्रत्युत्तर काँग्रेस आणि भाजपच्या वतीनं देण्यात आलं. त्यामुळं विधानसभेत भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार गदारोळ केला. 

    शेतकऱ्यांच्या तांदूळ पिकाला भाव मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून ओडिशा विधानसभेत भाजप आमदार सुभाष पाणीग्राही यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावरून ओडिशातलं वातावरण चांगलंच तापलंय. याच मुद्द्यावरून ओडिशाच्या विधानसभेत जोरदार गदारोळ झाला.

    आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा असून आमदार पाणीग्राही यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी बिजू जनता दलाच्या वतीनं करण्यात आली. पाणीग्राही यांच्या कृत्यामुळं चुकीचा संदेश जनतेत गेला असून त्यांनी तातडीनं माफी मागणं गरजेचं असल्याचं बिजू जनता जलानं म्हटलंय. त्यावर, शेतकऱ्यांना तांदळाला भाव द्या आणि मग माफीची मागणी करा, असं प्रत्युत्तर काँग्रेस आणि भाजपच्या वतीनं देण्यात आलं. त्यामुळं विधानसभेत भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार गदारोळ केला.

    ओडिशामध्ये लाखो शेतकरी तांदळाचं उत्पादन करतात. मात्र या तांदळाला भाव नसल्यामुळे आणि सरकार खरेदी करत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. २ लाख क्विंटलपेक्षा अधिक तांदूळ पडून आहेत. तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवूनही सरकारकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे व्यथित होऊन आपण आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुभाषचंद्र पाणीग्राही यांनी दिलीय.

    ओडिशाच्या देवगड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे पाणीग्राही हे गेल्या काही दिवसांपासून तांदूळ खरेदीच्या मुद्द्यावरून आक्रमक आहेत. अन्नपुरवठा मंत्री रणेंद्र प्रताप स्वैन हे विधानसभेत तांदूळ खरेदीच्या प्रश्नावर उत्तर देत होते. हे उत्तर सुरू असतानाच आमदार पाणीग्राही यांनी सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हा मुद्दा ओडिशाच्या राजकारणात सध्या कळीचा बनला असून दोन्ही बाजूंनी यावर राजकीय दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत.