विषारी दारु प्रकरणात भाजपा नेत्याला अटक; १०८ जणांनी गमावला होता जीव

उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूने तब्बल 108 जणांचा बळी घेतला आहे. अलीगडमधील करसुआ गावात विषारी दारू प्यायल्याने 108 लोकांचे मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे.  दरम्यान याप्रकरणी आता मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

    नवी दिल्ली : देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूने तब्बल 108 जणांचा बळी घेतला आहे. अलीगडमधील करसुआ गावात विषारी दारू प्यायल्याने 108 लोकांचे मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

    दरम्यान याप्रकरणी आता मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ऋषी शर्मा असं या मुख्य आरोपीचं नाव असून तो भाजपाचा नेता असल्याची माहिती मिळत आहे. रविवारी सकाळी बुलंदशहर बॉर्डरवरुन अटक केली आहे.

    पोलिसांनी शर्मा याची माहिती देणाऱ्यांसाठी एक लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. याआधी शनिवारी 25 हजारांचं बक्षीस जाहीर केलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली होती. तर, भाजपा नेता ऋषी शर्माचं अवैध फार्म हाऊस जेसीबीच्या सहाय्याने उद्धवस्त करण्यात आलं होतं. विषारी दारूमुळे होणाऱ्या लोकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढतच आहे. प्रकरणाचा तपास वेगानं होऊ लागताच माफियांनी कारवाईच्या भीतीनं विषारी दारू कालव्यात ओतून दिली. यानंतर सर्वात आधी जवां कालव्यातील विषारी दारू प्यायल्यानं 10 कामगारांचा मृत्यू झाला. अकराबादमध्ये शेखा कालव्यात मिळालेली दारू प्यायल्यानं कामगारांची प्रकृती बिघडली आहे.

    शनिवारी बिहारमधील पाच कामगारांचा जेएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. विषारी दारू प्रकरणात फरार असलेला आरोपी भाजपा नेता बीडीसी ऋषी शर्मा याच्या जवां ठाण्याच्या क्षेत्रातील फार्महाऊसवर शनिवारी प्रशासनाने जेसेबीच्या सहाय्यानं कारवाई केली. एसडीएम कोल रंजीत सिंह यांच्या नेतृत्वातील टीमनं ही कारवाई केली. या फार्महाऊसचा काही भाग सरकारी जमिनीवर असल्याचंही तपासात समोर आलं आहे. जवां आणि अकराबाद क्षेत्रात कॅनलमध्ये वाहून आलेली अवैध दारू प्यायल्यानं अनेक लोकांनी जीव गमावला आहे.

    तसेचं गंगा कालव्याची साफसफाई करण्याबरोबरच पाटबंधारे विभाग अवैध दारू शोधून नष्ट करेल. दोन दिवस हा कालवा बंद ठेवण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला डीएम यांनी दिल्या आहेत. विभाग कालवा बंद करुन साफसफाई करेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गावच्या सरपंचांनी ऑक्टोबर 2020 मध्येच तक्रार देऊन हा दारूचं हे दुकान बंद करण्याची मागणी केली होती. मात्र तो बंद झाला नाही आणि आता 108 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अलीगडमधील करसुआ गावात विषारी देशी दारूची विक्री केली जात आहे.