manish shukla shot dead

रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मनिष शुक्ला टीटागड पोलिस स्टेशन समोरील पक्ष कार्यालयात बसले होते, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान दुचाकीस्वार हल्लेखोरांनी येथे येऊन त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीष शुक्ला यांना त्वरित बैरकपूरमधील बीएन बोस रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) उत्तर २४ परगना जिल्ह्यात रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी भाजप नेते मनीष शुक्ला यांची गोळ्या घालून हत्या (BJP leader shot dead) केली. जिल्ह्यातील टीटागड पोलिस ठाण्यासमोर मनीष शुक्लाची (Manish Shukla) हत्या करण्यात आली. त्यानंतर येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनास्थळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मध्यरात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त येथे तैनात आहे. त्याचबरोबर राज्यात बैरकपूर येथे भाजपने बंदची हाक दिली आहे. ही बाब गांभीर्याने घेत राज्यपाल जयदीप धनखड यांनी राज्याच्या डीजीपी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्दय़ावर चर्चेसाठी सोमवारी राजभवनात बोलावले आहे.

रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मनिष शुक्ला टीटागड पोलिस स्टेशन समोरील पक्ष कार्यालयात बसले होते, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान दुचाकीस्वार हल्लेखोरांनी येथे येऊन त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीष शुक्ला यांना त्वरित बैरकपूरमधील बीएन बोस रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला अपोलो रुग्णालयात पाठविण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी पश्चिम बंगाल भाजपने बैरकपूरमध्ये १२ तासांचा बंद पुकारला आहे.

सीबीआय चौकशीची मागणी

सीबीआय चौकशी करण्यात यावी,  (activists demand CBI probe) अशी मागणी भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी केली आहे. त्याचबरोबर पोलिस आता मनीष शुक्ला यांचे पोस्टमॉर्टम करून अधिक तपास करत आहेत. पश्चिम बंगाल भाजपचे सरचिटणीस संजय सिंह यांनी ममता बॅनर्जी सरकारवर या घटनेबाबत प्रश्न केला आहे. त्याचबरोबर त्यांनी बैरकपूरमध्ये अधिकृतपणे बंद पुकारण्याविषयीही माहिती दिली आहे.