bjp leader uma bharti tests covid positive

तीन दिवसांपासून आपल्याला थोडासा ताप येत असल्याने आपण प्रशासनाला माहिती दिली आणि माझी कोरोना चाचणी (corona test) करून घेतली. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह (positive) आला आहे.

  • वंदे मातरम कुंजमध्ये स्वतःला क्वारंटाइन करत असल्याची माहिती

उत्तराखंड : भाजपच्या नेत्या(bjp leader) उमा भारती (Uma Bharti) यांना कोरोनाची लागण (Corona) झाली आहे. त्यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. तीन दिवसांपासून आपल्याला थोडासा ताप येत असल्याने आपण प्रशासनाला माहिती दिली आणि माझी कोरोना चाचणी (corona test) करून घेतली. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह (positive) आला आहे. त्यामुळे ऋषीकेश आणि हरिद्वारदरम्यान असलेल्या वंदे मातरम कुंजमध्ये आपण स्वतःला क्वारंटाइन (Quarantine) करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

आपल्याला तीन दिवसांपासून ताप येत असल्याने आपल्या हिमालय यात्रेच्या शेवटच्या दिवशी प्रशासनाला बोलावून मी कोरोना चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या यात्रेदरम्यान आपण कोविडबाबतच्या सर्व नियमांचे पालन केल्याचेही त्यांनी सांगितले. तरीही माझा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्यांनी आरोग्य तपासणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच आपण सध्या वंदे मातरम कुंजमध्ये क्वारंटाइन असून चार दिवसानंतर आरोग्य तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.